मराठी बातम्या  /  Lifestyle  /  These 3 Small Mistakes Can Ruin Your Relationship

Relationship Tips: या ३ छोट्या चुका बिघडू शकतात तुमचे नाते!

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स (Freepik )
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
May 10, 2023 08:10 AM IST

लग्नानंतर लोक नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे त्यांचे नाते बिघडू शकते. अशा परिस्थितीत या चुका जाणून घेणे गरजेचे आहे.

Relationship Tips: सगळ्या नात्यांपेक्षा नवरा बायकोचं नातं फार वेगळं असतं तेवढंचं ते नाजूकही असतं. या नात्यात जरा जरी काही बिघडलं तर ते नातं समपुष्टात येतं. वैवाहिक जीवन हे गाडीच्या चार चाकांसारखे असते, ज्यामध्ये पुढची दोन चाके पत्नीची म्हणून ओळखली जातात आणि मागील दोन चाके पतीची म्हणून ओळखली जातात. अशा परिस्थितीत एक चाकही खराब झाले तर संपूर्ण वाहन थांबू शकते, खराब होऊ शकते. म्हणजे वैवाहिक जीवनात काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण नात्यावर होऊ शकतो. अनेकदा लोक वैवाहिक जीवनात नकळत काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. अशा परिस्थितीत या चुकांची जाणीव असणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुमच्याकडून नकळतपणे होऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

या चुकांकडे लक्ष द्या

> जोडीदाराला वेळ न देणे ही देखील मोठी चूक आहे. तुम्ही असा विचार करत असाल की पार्टनर जर समजूतदार असेल तर नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पण सांगा की प्रेमाव्यतिरिक्त तुमच्या जोडीदारालाही तुमचा वेळ हवा असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत असाल, परंतु त्यांना वेळ देऊ शकत नसाल, तर याचाही नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुमच्या नात्याला थोडा वेळ द्या. याशिवाय वीकेंडला तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत फिरायलाही जाऊ शकता. यामुळे नाते तर घट्ट होईलच पण प्रेमही टिकून राहील.

Healthy Relationship: नात्यात 'या' गोष्टी ठरतात अडथळा!

> पती-पत्नीच्या जीवनात विश्वासाला खूप महत्त्व आहे. अशा वेळी कोणी खोटं बोलू लागलं किंवा गोष्टी लपवू लागलं तर नात्यात भिंत उभी राहते. जोडीदाराने नेहमी खरे बोलावे आणि गोष्टी लपवणे टाळावे.

Relationship Tips: ब्रेकअप नंतर मूव्ह ऑन करण्यासाठी हे ७ मार्ग ठरतील प्रभावी!

> काही भागीदारांना महत्त्वाचे मुद्दे पुढे ढकलण्याची सवय असते. असे करताना नात्यात दुरावा येऊ शकतो. समस्या टाळण्याऐवजी ते सोडवण्याचा प्रयत्न करा. समस्या टाळल्याने काहीवेळा तुमचा पार्टनर तुम्हाला निष्काळजी समजतो. अशा परिस्थितीत ते टाळणे टाळावे.

World Sleep Day: ७०% जोडप्यांना होतो जोडीदाराच्या घोरण्याचा त्रास; सर्व्हे

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel