मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Spices to Control Cholesterol: ‘हे’ ३ भारतीय मसाले वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करायला करतील मदत!
Health Tips
Health Tips (Freepik )

Spices to Control Cholesterol: ‘हे’ ३ भारतीय मसाले वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करायला करतील मदत!

18 March 2023, 14:20 ISTTejashree Tanaji Gaikwad

Cholesterol Control:असे अनेक स्वयंपाकघरातील मसाले आहेत जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतील.

High Cholesterol: शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हा चरबीसारखा पदार्थ आहे जो चिकट असतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त पोहोचणे कठीण होते. अशा परिस्थितीत हृदयापर्यंत रक्त पोहोचत नसल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदनाही सुरू होतात. हे सहसा लठ्ठपणा आणि चरबीयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे होते. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी आहारात विविध बदल करणे आवश्यक होते. काही मसाल्यांबद्दल सांगत आहोत जे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतील.

ट्रेंडिंग न्यूज

दालचिनी

हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर मसाला आहे. याच्या वापराने रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते आणि कोलेस्टेरॉलमुळे बंद झालेल्या धमन्या उघडतात. त्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म विशेषतः रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. दालचिनीचे सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चहा बनवणे आणि पिणे. दालचिनी चहा बनवणे खूप सोपे आहे. एक कप पाणी उकळून त्यात दालचिनीचे तुकडे टाका आणि थोडा वेळ उकळून घ्या, तुमचा चहा तयार आहे.

मेथी दाणे

मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासह आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. मेथीच्या दाण्यांमध्ये असे संयुगे असतात जे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल शोषण्याची प्रक्रिया कमी करतात. मेथीचे सेवन करण्याचे अनेक मार्ग आहेत. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या. मेथीचे दाणेही वेगवेगळ्या पदार्थात घालता येतात. याशिवाय मेथीच्या दाण्यांचा चहा बनवून तो पिणेही फायदेशीर ठरते.

हळद

औषधी गुणधर्मांनी भरलेली हळद आरोग्यासाठी अनेक फायदे देते. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन विशेषतः आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हळदीतील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अनेक आजारांपासून आराम देतात. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणे समाविष्ट आहे. हळद गरम पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्यायला मिळते. याशिवाय जास्तीत जास्त खाद्यपदार्थांमध्ये हळद घालू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग