खरेदी केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दुकानदारासोबत शेअर करणे अनिवार्य आहे का? जाणून घ्या
अनेकदा बिल बनवण्यापूर्वी आपला मोबाइल नंबर मागितला जातो. हे नियमबाह्य आहे असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
फोन कॉल्स आणि मेसेजद्वारे स्कॅम होत असल्याच्या घटना, बातम्या काही दिवसांपासून दिसत आहेत. यामुळेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी एक पत्रक जारी करून त्यात ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की,किरकोळ विक्रेत्यांना खरेदीदारांच्या वैयक्तिक संपर्क तपशीलांचा आग्रह धरू नये. ग्राहकांनी त्यांचे संपर्क तपशील शेअर न केल्यास विक्रेते सेवा देण्यास नकार देत असल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केल्यानंतर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सिंग यांनी मीडियाला सांगितले, “विक्रेते म्हणतात की वैयक्तिक संपर्क तपशील न दिल्यास ते बिल तयार करू शकत नाहीत. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ही अनुचित आणि प्रतिबंधात्मक व्यापार प्रथा आहे आणि अशी माहिती गोळा करण्यामागे कोणताही तर्कसंगतता नाही." गोपनीयतेचीही चिंता असल्याचे सांगून सिंग म्हणाले की, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यासह किरकोळ उद्योग आणि उद्योग मंडळांना ग्राहकांच्या हितासाठी एक सल्लागार जारी करण्यात आला आहे.
सिंग पुढे म्हणाले की, काहीतरी डिलिव्हरी करण्यासाठी किंवा बिल तयार करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना फोन नंबर देणे भारतात आवश्यक नाही.
विभाग