मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral : जगातल्या या देशात राहतात सर्वाधिक सेक्सी आणि रोमँटिक लोक; पाहा लिस्ट

Viral : जगातल्या या देशात राहतात सर्वाधिक सेक्सी आणि रोमँटिक लोक; पाहा लिस्ट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 14, 2022 02:40 PM IST

सेक्सी आणि रोमँटिक कपल्सबद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. परंतु एखादा संपूर्ण देशच रोमँटिक आहे, असं तुम्ही कधी ऐकलंय का, नाही तर वाचा सविस्तर...

Romantic Country In The World
Romantic Country In The World (HT)

Viral News : अनेकदा तुम्हाला तुमचा पार्टनर किंवा मित्र अधिक रोमँटिक आणि सेक्सी असल्याचं जाणवतं. तुम्हाला त्यांच्या सहवासात वेळ घालवण्याची देखील इच्छा होत असेल. परंतु जगातील सर्वात रोमँटिक देश कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?, नाही ना. तर काही दिवसांपूर्वीच यासंदर्भाक एक सर्वे करण्यात आला होता. ज्यात जगातील सर्वात रोमँटिक आणि सेक्सी असलेल्या देशाच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे.

'Loveit Coverit या कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात युरोपमधील स्कॉटलंड हे सर्वाधिक रोमँटिक आणि सेक्सी देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. या क्रमवारीत स्कॉटलंडनं ब्रिटिश, वेल्श, आइरिश, फ्रेंच इटालियन आणि अमेरिकी लोकांनाही मागं टाकलं आहे. त्यामुळं आता जगातील सर्वाधित सेक्सी आणि रोमँटिक लोक हे स्कॉटलंडमध्ये राहत असल्याचा दावा या कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. हे संशोधन करण्यासाठी संबंधित कंपनीनं युरोपातील विविध देशांमधील दोन हजार लोकांची मतं जाणून घेतली, त्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. या क्रमवारीत स्कॉटलंडला ४३ टक्के गुण मिळाले आहेत तर इटलीने ३० टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पाहा टॉप १० लिस्ट...

१. स्कॉटलंड (४३%)

२. इटली (४१%)

३. फ्रान्स (३८%)

४. इंग्लंड (३७%)

५.स्पेन (३५%)

६.अमेरिका (३४%)

७. पोर्तुगाल (३२%)

८. आयर्लंड (३२%)

९. स्वीडन (३१%)

१०. वेल्स (३०%).

संबंधित कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधित लोकांना वाटतं की स्कॉटिश लोक हे सर्वोत्तम पार्टनर आणि लव्हर्स आहेत. याशिवाय ते अधिक रोमँटिक आणि सेक्सी असल्याचंही या संशोधनात मत व्यक्त केलेल्या लोकांनी सांगितलं आहे.

हे संशोधन कंपनीनं युरोपातील वेगवेगळ्या आणि सुंदर देशांमध्ये केलेलं आहे. या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग सर्वाधिक होता. त्यामुळं आता हा रिपोर्ट समोर आल्यानंतर स्कॉटलंडमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या