Chanakya Niti for Woman: चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांनी चाणक्य नीती लिहली. चाणक्य नीतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूचे वर्णन केले आहे. त्यांनी नातेसंबंधाविषयी पण त्यात सांगितले आहे. त्यांनी स्त्री-पुरुषांचे चारित्र्य काय असावे तेही सांगितले आहे. पती किंवा पत्नी दोघांच्याही चारित्र्यामध्ये दोष असेल तर सुखी संसार तुटतो. त्याच वेळी, पुरुष आणि स्त्रीचे चांगले आणि मजबूत चारित्र्य घराला स्वर्ग बनवते. चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांच्या चारित्र्याबाबतही खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार विशिष्ट प्रकारच्या स्त्रियांचा सहवास टाळावा, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होते. चला याबद्दल जाणून घेऊयात..
> आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्री ही देवीसारखी असते, तिला घरची लक्ष्मी म्हणतात. स्त्रीमध्ये घर स्वर्ग आणि नरक दोन्ही बनवण्याची ताकद आहे. याच कारणांमुळे स्त्रीला जीवनसाथी म्हणून निवडणे खूप विचारपूर्वक केले पाहिजे. इतकंच नाही तर अशा प्रकारच्या महिलेसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका, अन्यथा तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकता.
> ज्या स्त्रीचे चारित्र्य चांगले नाही ती असभ्य वर्तन करते. अशी स्त्री संपूर्ण कुटुंबाची बदनामी करते.
> पाहुण्यांचे स्वागत न करणार्या आणि मोठ्यांचा आदर न करणार्या स्त्रीचा सहवास तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून आणि नातेवाईकांपासून दूर करू शकतो. शिवाय, अशा स्त्रीमुळे कुटुंबाचा अपमान होतो.
> जी स्त्री अनावश्यकपणे पैसे खर्च करते, मुलांना चांगले संस्कार देत नाही, अशी स्त्री कुटुंबासाठी चांगली नाही.
> स्त्रीने नवीन पिढीचे चांगले संगोपन न केल्याने त्यांचे मोठे नुकसानही होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)