Happy Teddy Day In Marathi : सध्या प्रेमी जोडप्यांचा व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. ७ ते १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन वीक साजरा करणं विशेष आकर्षणाचा भाग झालं आहे. प्रेमी युगल या टे मध्ये विविध पद्धतीने आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्नशील असतात. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे नंतर सेलीब्रेट होतो टेडी डे. सोमवार १० फेब्रुवारी रोजी टेडी डे साजरा होईल. मुलींना टेडी फार आवडतात. सॉफ्ट असा हा टेडी मुलींसाठी आकर्षणच आहे. तुम्ही पण टेडी डे साजरा करताय तर या दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला क्युट टेडी गिफ्ट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू शकता. फक्त टेडी न देता जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी आणि आकर्षक वाटावं म्हणून टेडीसह द्या या हटके शुभेच्छा.
प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही
अजुनही तिथेच आहे उभा तू मागे वळून पाहिलंच नाही
हॅपी टेडी डे
…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला तुला पाहायचे आहे,
तुझ्या मिठीत मला कायम विसवायचे आहे
माझा टेडी तूच आहेस
टेडी डे च्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी आहेस तू
टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा
…
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे
टेडी डे च्या खूप खूप शुभेच्छा
…
कितीही भांडण झाली तरी,
तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा कितीही
ताणला तरी तुटत नाही
हॅपी टेडी डे
…
तुझं हसणं आणि माझं फसणं
दोन्ही एकाचवेळी घडतं,
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडतं
टेडी डे च्या खूप खूप शुभेच्छा
…
गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहे,
हळुवार भावना आहेत तेथे
अतुट प्रेम आहे,
जिथे अतूट प्रेम आहे
तेथे नक्कीच तू आहेस
हॅपी टेडी डे
…
आयुष्यात हवी होती एक आशा
तुझ्या रुपाने मला मिळाली एक नवी दिशा
टेडी डे च्या शुभेच्छा
…
पहाटेचा वारा खूप काही सांगून गेला,
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला
हॅपी टेडी डे
संबंधित बातम्या