Happy Teddy Day : टेडी डे का साजरा करतात; याची सुरुवात कशी झाली? खूपच रंजक आहे स्टोरी, वाचा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Happy Teddy Day : टेडी डे का साजरा करतात; याची सुरुवात कशी झाली? खूपच रंजक आहे स्टोरी, वाचा

Happy Teddy Day : टेडी डे का साजरा करतात; याची सुरुवात कशी झाली? खूपच रंजक आहे स्टोरी, वाचा

Published Feb 09, 2025 03:52 PM IST

Teddy Day 2025 : इतिहासापासून महत्त्वापर्यंत, जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवसाबद्दल सर्व काही.

Happy Teddy Day : छ टेडी डे का साजरा करतात; याची सुरुवात कशी झाली? खूपच रंजक आहे स्टोरी, वाचा
Happy Teddy Day : छ टेडी डे का साजरा करतात; याची सुरुवात कशी झाली? खूपच रंजक आहे स्टोरी, वाचा (Pexels)

Teddy Day History, Significance : व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना आणि आपल्या प्रियजनांना टेडी गिफ्ट देतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो. 

पण हा ेटेडी डे का साजरा केला जातो? टेडी डेची सुरुवात कधी झाली? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर टेडी डेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

टेडी डे साजरा करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली मानली जाते. या दिवशी जोडपे आपल्या जोडीदाराला टेडी किंवा कोणतेही सॉफ्ट टॉय भेट देतात. सोबतच तुम्ही त्यावर एक सुंदर नोटही लिहू शकता.

दरवर्षी व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. यावर्षी टेडी डे (१० फेब्रुवारी) सोमवारी आहे.

टेडी डेचा इतिहास

१४ फेब्रुवारी १९०२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट मिसिसिपीच्या जंगलात शिकार करायला गेले होते. त्यांचा साथीदार होल्ट कॉलियरही त्यांच्यासोबत होता. यावेळी होल्ट कॉलियर याने काळ्या अस्वलाला पकडले, त्याला झाडाला बांधले आणि राष्ट्रपतींकडे त्याला मारण्याची परवानगी मागितली.

पण त्या अस्वलाला पाहून राष्ट्रपतींना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला मारण्याची परवानगी दिली नाही. यानंतर १६ नोव्हेंबर रोजी या घटनेवर आधारित एक व्यंगचित्र 'द वॉशिंग्टन पोस्ट' वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले, ते व्यंगचित्रकार क्लिफर्ड बेरीमन यांनी बनवले होते.

'द वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र पाहून व्यावसायिक मॉरिस मिक्टम यांना वाटले की, लहान मुलांसाठी अस्वलाच्या आकाराची खेळणी बनवता येतील. त्यांनी आपल्या पत्नीसह ते डिझाइन केले आणि दोघांनी त्या खेळण्याचे नाव टेडी ठेवले.

Celebrate Teddy day by gifting teddy bears to your beloved.
Celebrate Teddy day by gifting teddy bears to your beloved. (Pexels)

वास्तविक, राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांचे टोपणनाव टेडी होते, म्हणून व्यावसायिक जोडप्याने खेळण्याला टेडी असे नाव दिले. राष्ट्रपतींची परवानगी घेतल्यानंतर त्यांनी हा टेडी बाजारात आणला.

टेडी डे का साजरा केला जातो?

व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्याचे खरे कारण म्हणजे मुली. खरं तर, बहुतेक मुलींना टेडीसारखी सॉफ्ट खेळणी खूप आवडतात, म्हणून त्यांना आनंद देण्यासाठी, टेडी डे साजरा केला जाऊ लागला.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner