shikshak din : भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ आपल्या शिक्षकांचे योगदान ओळखण्याचा नाही, तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीदेखील आहे. शिक्षक आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते आपल्याला केवळ शिक्षणच देत नाहीत तर आपले चारित्र्य, मूल्ये आणि आदर्श निर्माण करतात. आपल्या देशात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शिक्षकांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले होते. आपलं आयुष्य शिक्षण आणि ज्ञानासाठी समर्पित करणारे ते खरे शिक्षक होते. यंदाच्या शिक्षक दिनाला तुमच्याही आवडत्या शिक्षकाला संदेश पाठवून त्यांचा दिवस खास बनवा.
''विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या,
शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्ही आम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवलीत,
त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
हॅप्पी टीचर्स डे!
“शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ, जो आमचं जीवन उजळतो.
तुमचं मार्गदर्शन आणि शिकवणीसाठी मनःपूर्वक आभार.
शिक्षक दिवसाच्या शुभेच्छा!”
''शिक्षक दिवसाच्या निमित्ताने, तुम्हाला मानाचा मुजरा.
तुमच्या शिकवणीमुळे आम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्याची प्रेरणा मिळाली.”
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
''आदरणीय शिक्षक, तुमच्या मार्गदर्शनामुळे
आम्ही जीवनाच्या अनंत वाटा ओलांडत आहोत.
तुमच्या ज्ञानाच्या दीपाने जीवनातील अंधार दूर केला आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“शिक्षणाच्या अमूल्य देणगीला मान देणारा दिवस आला आहे.
तुम्ही जसे प्रेरित करता तसेच आम्ही जीवनाच्या मार्गावर चालत राहू.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
“शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुमच्या अद्वितीय योगदानाला मान देतो.
तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशानेच आम्ही उजळलो आहे.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
“शिक्षक म्हणजेच ज्ञानाचा सागर आणि प्रेरणांचा प्रकाश.
तुमच्या मार्गदर्शनानेच आम्ही जीवनातील संपूर्णता अनुभवली आहे.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
“तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त शिकवत नाही,
तर त्यांना प्रेरित करता आणि मार्गदर्शन करता.
शिक्षक दिनाच्या दिवशी तुमच्या समर्पणाला सन्मान आणि आभार!”
हॅप्पी टीचर्स डे!
“तुम्ही केवळ शिक्षक नाहीत, तर एक प्रेरणादायक मार्गदर्शक आहात.
तुमच्या समर्पणामुळे जीवनातील प्रत्येक टप्प्यावर यश मिळवता आले आहे.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
''तुमच्या शिकवणीतून मिळालेलं ज्ञान, आमचं जीवन समृद्ध करणारं आहे.
तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच यशाच्या शिखरावर पोहोचवेल.
शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”