World Hindi Day 2023: मुलांना हिंदी शिकवायची शिक्षकांची ही स्टाईल एकदा बघाच; video viral-teacher unique way of teaching hindi video viral ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Hindi Day 2023: मुलांना हिंदी शिकवायची शिक्षकांची ही स्टाईल एकदा बघाच; video viral

World Hindi Day 2023: मुलांना हिंदी शिकवायची शिक्षकांची ही स्टाईल एकदा बघाच; video viral

Jan 10, 2023 09:23 AM IST

Teacher Viral Video: नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका शिक्षकाचा एक रंजक व्हिडीओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये शिक्षकाची शिकवण्याची पद्धत खरोखरच अप्रतिम आहे, जी पाहिल्यानंतर युजर्स सुद्धा शिक्षकाच्या या अनोख्या पद्धतीचे कौतुक करताना थकत नाहीत.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ (@Ankitydv92 / Twitter )

Teacher Musical Way Of Teaching: मुलांना शिकवणे ही काही सोपी गोष्ट नाही, तीही जेव्हा एक-दोन नव्हे तर अनेक मुले एकत्र बसून अभ्यास करतात. हे आव्हान शिक्षकांसाठी मोठं आव्हान असते. पण काही शिक्षक असे असतात जे वर्गातील मुलांवर नियंत्रण ठेवू शकतात. मुलांना खेळत खेळत वेगळ्या अंदाजात अवघड विषयही सहजरित्या समजावतात. असाच काहीस नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुलंही शांतपणे शिकताना दिसत आहेत.

असे म्हटले जाते की एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो, कारण ते त्यांना कठोर परिश्रम करून काहीतरी साध्य करण्यासाठी प्रेरित करतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गात बसलेल्या लहान मुलांना मजेशीर पद्धतीने हिंदी अक्षरे शिकवत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक या शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धतीचे चाहते होत आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर्गाच्या खोलीत एक शिक्षक ब्लॅकबोर्डसमोर उभे आहेत, ज्यावर हिंदी अक्षरांची काही अक्षरे लिहिली आहेत. या दरम्यान, शिक्षक प्रत्येक अक्षरासाठी एक विशेष ओळ गाताना दिसतात, ज्याची मुले देखील पुनरावृत्ती करतात. हा व्हिडीओ खरोखरच अप्रतिम आहे, जो पाहून तुमचेही मन प्रसन्न होईल.

Viral Video: काही सेकंदात वाहत्या प्रवाहाने गिळलं शेत; नैसर्गिक आपत्ती की अजून काही?

बघा व्हायरल व्हिडीओ

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Ankitydv92 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. नेटिझन्स हा व्हिडीओ खूप पसंत करत आहेत. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'शिकवण्याचा किती चांगला मार्ग आहे, महान शिक्षक.' या व्हिडीओला आतापर्यंत ५१३.४ हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर २४.५ हजार लोकांनी हा व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स त्यावर विविध मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे कौतुक करतानाही आपण थकत नाही.

विभाग