Best and Worst Rated Indian Food: जेवणात प्रत्येकाच्या आवडी-निवडी खूप वेगळ्या असतात. एखाद्याला एखादी गोष्ट खूप आवडत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला ती अजिबात आवडत नसेल असे असू शकते. आता खाण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट कोणती हे ठरवणे खरं तर खूप अवघड आहे. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टेस्ट अॅटलासने स्वत:ची एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टॉप १० वर्स्ट आणि बेस्ट रेटेड इंडियन डिशचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी आल्यापासून बरीच चर्चेत आहे, विशेषत: सर्वात खराब रेटेड डिशमध्ये प्रथम आलेल्या डिशने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. चला तर पाहूया तुमच्या आवडत्या डिशला किती रेटिंग देण्यात आले आहे.
टेस्ट अॅटलासच्या फूड लिस्टमधल्या बेस्ट फूडच्या यादीतील पहिली नावं पाहून तुम्हाला आनंद आणि आश्चर्य वाटेल. फळांच्या राजा आंब्यापासून बनवलेला स्वादिष्ट मँगो लस्सीने बाजी मारली आहे. या यादीत चहा मसाला दुसऱ्या तर बटर गार्लिक नान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अमृतसरी कुलचा, पाचव्या क्रमांकावर बटर चिकन, सहाव्या क्रमांकावर हैदराबादी बिर्याणी, सातव्या क्रमांकावर शाही पनीर, तर आठव्या क्रमांकावर सर्वांचे आवडते छोले भटूरे आहे. त्याखालोखाल तंदूरी चिकन नवव्या तर कोरमा दहाव्या क्रमांकावर आहे.
सर्वात खराब रेटेड डिशच्या यादीतील पहिले नाव आपल्याला खरोखर आश्चर्यचकित करेल. कदाचित ही तुमची आवडती गोष्ट सुद्धा असू शकते. सर्वात खराब रेटिंगच्या यादीत पहिले नाव आहे जलजीरा. उन्हाळ्यात प्यायले जाणारे हे मसालेदार ताजे ड्रिंक सर्वात खराब रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. यानंतर दुसऱ्या नंबरची डिश अधिक चकीत करणारी आहे. हिवाळ्यात मोठ्या आवडीने खाल्ले जाणारे गज्जक सर्वात खराब रेटिंग यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण भारतीय पदार्थ थेंगई सदम, चौथ्या क्रमांकावर ओडिशाचा प्रसिद्ध पंता भात, पाचव्या क्रमांकावर आलू वांग्याची भाजी आणि सहाव्या क्रमांकावर थंडाई आहे. सातव्या नंबरवर केरळची डिश अच्छप्पम, आठव्या क्रमांकावर प्रसिद्ध हैदराबादी मिर्ची सालन, नवव्या क्रमांकावर स्वीट डिश मालपुआ आहे, तर शेवटच्या क्रमांकावर ब्रेकफास्टमध्ये सर्वाधिक खाल्ला जाणारा उपमा आहे.
टेस्ट अॅटलसची यादी जाहीर होताच लोकांमध्ये सर्वात वाईट रेटेड फूड्सबद्दल प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या यादीत अग्रस्थानी असलेला जलजीरा उन्हाळ्यात संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पिले जाते. त्यामुळे खराब रेटेड लिस्टमध्ये त्याचे नाव येणे लोकांना आवडले नाही. यासोबतच ब्रेकफास्टमध्ये बहुतांश लोकांची पसंती असणारा इन्स्टंट उपमा सुद्धा या लिस्टमध्ये उपस्थित असल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बरं, आता यात कितपत तथ्य आहे की नाही, हा वेगळा विषय आहे. तूर्तास तुमचा आवडता पदार्थाला किती रेटिंग मिळाले, ते कोणत्या स्थानावर आहे हे पाहा.
संबंधित बातम्या