Sun Tan Remove: टॅनिंग दूर करण्यासाठी उत्तम आहेत हे फेस पॅक, घरी झटपट तयार करून लावा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sun Tan Remove: टॅनिंग दूर करण्यासाठी उत्तम आहेत हे फेस पॅक, घरी झटपट तयार करून लावा

Sun Tan Remove: टॅनिंग दूर करण्यासाठी उत्तम आहेत हे फेस पॅक, घरी झटपट तयार करून लावा

Jun 03, 2024 12:59 PM IST

Tanning Removal: कडक उन्हामुळे आणि उष्णतेमुळे जर तुमचा चेहरा काळवंडला असेल तर तुमची त्वचा झटपट स्वच्छ करण्यासाठी हे ३ फेस पॅक वापरा. हे फेस पॅक कसे तयार करायचे ते जाणून घ्या.

टॅनिंग दूर करण्यासाठी फेस पॅक
टॅनिंग दूर करण्यासाठी फेस पॅक (unsplash)

Homemade Face Packs to Remove Sun Tan: सूर्याच्या तीव्र किरणं तुमचा चेहरा जाळतो, ज्यामुळे चेहरा डल आणि काळा दिसतो. उन्हामुळे चेहऱ्यावरील ओलावाही दूर होतो. अशा परिस्थितीत त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हामुळे काळी झालेली त्वचा उजळवण्यासाठी तुम्ही या ३ प्रकारांपैकी कोणताही एक फेस पॅक लावू शकता. हे फेस पॅक तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी उत्तम आहे. जाणून घ्या हे फेस पॅक घरी झटपट कसे बनवायचे.

१. टोमॅटो, एलोवेरा जेल आणि मसूर डाळ यांचा फेस पॅक

टोमॅटो तुमच्या त्वचेचा रंग हलका करू शकतो. याच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्याच वेळी, लाल मसूर डाळ त्वचा चमकदार बनविण्याबरोबरच ती

मुलायम बनविण्यास मदत करते. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- दोन टेबलस्पून एलोवेरा जेल

- एक टेबलस्पून मसूर डाळ पावडर

- टोमॅटोचा रस

कसे बनवावे

हा फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीत सर्व साहित्य मिक्स करा आणि एक गुळगुळीत पेस्ट बनवा. हे मिश्रण संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. सुमारे ३० मिनिटे ते राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

२. दूध आणि भाजलेल्या हळदीचा फेस पॅक

उन्हाळ्यात टॅनपासून मुक्त होण्यासाठी हा फेस पॅक उत्तम आहे. हा फेस पॅक केवळ सन टॅन दूर करण्यास मदत करत नाही तर त्वचेचा टोन सुधारण्यासाठी देखील चांगला आहे. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- दूध

- एक टेबलस्पून भाजलेली हळद

कसे बनवावे

एका वाटीत दूध आणि हळद एकत्र मिक्स करा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. हे मिश्रण संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. आता साधारण १५ मिनिटे राहू द्या. नंतर

पाण्याने धुवून स्वच्छ करा. जर हे लावल्यानंतर त्वचा कोरडी वाटत असेल तर तुम्ही एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावू शकता.

३. कॉफी, हळद आणि दही याचा फेस पॅक

कॉफीमध्ये त्वचा गोरी करण्याचे गुणधर्म आहेत. टॅनिंगमुळे अनईव्हन त्वचा टोन कमी करते. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- अर्धा टीस्पून हळद

- एक टेबलस्पून कॉफी

- दोन चमचे दही

कसे बनवावे

हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्स करा आणि एक स्मूथ पेस्ट बनवा. त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. सुमारे २० मिनिटे राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा. जर हे लावल्यानंतर त्वचा कोरडी वाटत असेल तर तुम्ही एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner