मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 18, 2024 12:48 PM IST

Tamarind Benefits And Uses: चिंचेमुळे जेवण चविष्ट तर बनतेच, पण त्याचबरोबर ते पौष्टिक देखील बनते. जाणून घ्या चिंचेचा वापर कसा करायचा...

केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच!
केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच!

Tamarind Benefits And Uses: चिंचेची आंबट-गोड चव प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करून देणारी असते. शाळेच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असण्याऱ्या हातगाडीवर अनेक गोड-आंबट गोळ्या, कैऱ्या आणि त्यासोबत कच्च्या आणि पिकलेल्या चिंचा देखील ठेवलेल्या असायच्या. शाळेत असताना बच्चेकंपनी या चिंच विकत घेऊन खायची. आजही बाजारात आंबट-गोड गोळ्यांसोबत चिंचेची विक्री होताना दिसते. उत्तर भारतात, दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत, फक्त गोड चटणी बनवण्यासाठी, जलजीरा आणि पाणीपुरीसाठी पाणी बनवण्यासाठी किंवा इतर प्रकारच्या चटण्या बनवण्यासाठी चिंच वापरले जात होते. पण, आता इडली-डोसासह सांबार, रसम आणि डाळींमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चिंचेमुळे जेवण चविष्ट तर बनतेच, पण त्याचबरोबर ते पौष्टिक देखील बनते. जाणून घ्या चिंचेचा वापर कसा करायचा...

ट्रेंडिंग न्यूज

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

अशा प्रकारे आहारात वापरा चिंच

> जेव्हा तूप किंवा तेल न वापरता छोले किंवा पांढरे वाटाणे बनवाल, तेव्हा त्यात मसाल्यासोबत चिंचेचा कोळ ही घाला. यामुळे केवळ चवच नाही तर रंग देखील सुंदर येतो.

> गोड चटणी बनवण्यासाठी खजूर बिया काढून बारीक करून त्याचा लगदा तयार करा. यात थोडा गूळ, साखर, बेदाणे, सुंठ, काळे आणि पांढरे मीठ, जिरे आणि चिंचेचा पल्प मिसळून गॅसवर घट्ट होईपर्यंत ढवळून काचेच्या बाटलीत भरून ठेवा. ही चटणी सहा महिने फ्रीजमध्ये ठेवता येते.

> उन्हाळ्यात चिंचेचे सरबत पिणे शरीरासाठी चांगले आहे. यासाठी चिंचेच्या कोळात थोडा गूळ, मीठ, जिरेपूड आणि पाणी घालून मिक्स करा. बर्फ घालून हे ड्रिंक सर्व्ह करा.

> झटपट चटणी बनवायची असेल, तर चिंचेच्या कोळात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, थोडी पिठी साखर, मीठ आणि मिरपूड घाला. या चटणीचा आस्वाद भजी आणि समोसासोबत घेता येतो.

> सूप, कडधान्ये, रस्सा भाजी, भात इत्यादींमध्ये थोडासा चिंचेचा कोळ घातल्याने चव आणखी वाढते.

> सत्तू सरबतमध्ये लिंबाऐवजी चिंचेचा कोळ, मीठ, जिरे, साखर इत्यादी टाकून पिणे शरीरासाठी चांगले आहे.

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

चिंच घेते आरोग्याचीही काळजी!

> चिंचेमध्ये असे काही ऍसिड्स आढळतात, जे पचनासाठी खूप फायदेशीर असतात. पोटदुखी आणि जुलाबाच्या समस्येवरही हे गुणकारी आहे.

> चिंचेमध्ये असे काही घटक आढळतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका कमी होतो.

> चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करते.

> पिकलेल्या चिंचेचा लगदा तळहातावर आणि तळव्यावर चोळल्याने उष्माघाताचा प्रभाव कमी होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग