Skin Care Tips for Rainy Season: पावसाळा म्हटलं की रिमझिम पाऊस, आल्हाददायक वातावरण यासोबत अनेक समस्या सुद्धा येतात. आरोग्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्या या काळात उद्भवतात. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. अशा वेळी त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्वचेला फ्रेश आणि स्वस्थ ठेवण्यासाठी काही गोष्टी न चुकता करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला सुद्धा पावसाळ्यात त्वचेच्या समस्या टाळायच्या असतील या स्किन केअर टिप्स फॉलो करायला विसरू नका. कांदिवली येथील डॉ. अश्विनी’स एस्थेटिक क्लिनिकच्या डॉ. अश्विनी प्रमोद जाधव यांनी पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स सांगितले आहे.
पावसाळ्यात त्वचेला स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून दोन वेळा सौम्य फेस वॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल दूर होईल.
पावसाळ्यातही त्वचेला मॉइश्चराइझ करण्याची गरज असते. हलके वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. यामुळे तुमची त्वचा फ्रेश राहील.
अनेकांना वाटते की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावे, पावसाळ्यात त्याची गरज नाही. पण हे चुकीचे आहे. पावसाळ्यातही अतिनीत किरणं त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरू नका.
संतुलित आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या. हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचा स्वस्थ राहील. हेल्दी आणि हायड्रेटेड स्किनसाठी संतुलित आहार आणि पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे.
आठवड्यातून एकदा घरगुती फेस मास्क आणि स्क्रब वापरा. हे त्वचेला पोषण देईल आणि मृत त्वचा काढून टाकेल.
ग्लिसरीन आणि गुलाब जल सम प्रमाणात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटेल.
ओलसर कपडे जास्त वेळ घातल्याने स्किन इंफेक्शन होण्याची भीती असते. तसेच पायातील बूटांमुळे सुद्धा त्वचेला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कपडे ओले झाल्यास लवकर बदला.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)