मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentine's Day: व्हॅलेंटाईनसाठी फ्रेश लूक हवाय? जान्हवी कपूरच्या लूक्सवरून घ्या प्रेरणा!

Valentine's Day: व्हॅलेंटाईनसाठी फ्रेश लूक हवाय? जान्हवी कपूरच्या लूक्सवरून घ्या प्रेरणा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 13, 2024 03:55 PM IST

Janhvi Kapoor look for Valentine's Day: १४ फेब्रुवारीला अर्थात व्हॅलेंटाईन डे ला सर्वात सुंदर दिसायचे असेल, तर जान्हवी कपूरचे हे हॉट इंस्टाग्राम लूक्स ट्राय करून पहा.

Valentine's Day 2024
Valentine's Day 2024 ( @janhvikapoor/ Instagram )

Fashion: १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस हा उद्या (बुधवारी) साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रेमी युगुलांना समर्पित आहे. अशा परिस्थितीत कपल्स हा दिवस खास बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मुलांपेक्षा मुली या दिवसाबद्दल जास्त उत्सुक असतात. या दिवसाठी विशेष तयारी केली जाते. प्रत्येकीला या दिवशी फार छान दिसायचं असतं. तुम्हालाही १४ फेब्रुवारीला सर्वात सुंदर दिसायचे असेल, तर जान्हवी कपूरचे हे हॉट इंस्टाग्राम लूक्स वापरून पहा. हे लूक्स इतके सुंदर आहेत की जर तुम्ही यावरून प्रेरणा घेतली तर तुमचा पार्टनर तुमच्यापासून नजर हटवू शकणार नाही.

या मरून गाऊनमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीसारखा हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता. जान्हवीने तिचे केस वेव्ही कर्ल केले आहेत आणि मेकअप कमीत कमी ठेवताना तिने अधिक ब्लश वापरला आहे.

या लेदर ड्रेसमध्ये जान्हवीचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. जर तुम्ही लेदर ड्रेस घालण्याचा विचार करत असाल तर हा लूक तुमच्यासाठी योग्य आहे. हा लेदर ड्रेस असल्याने जान्हवीने या लूकमध्ये प्रयोग केला आहे. तिने आपले केस ओले ठेवले आहेत आणि स्मोकी आय मेकअप केला आहे ज्यामुळे ती अधिक बोल्ड दिसत आहे.

 

या दिवशी शक्यतो लाल रंगाचे ड्रेस घातले जातात. पण जर तुम्हाला लाल रंगाचा ड्रेस घालायचा नसेल तर तुम्ही काळ्या रंगाने जाऊ शकता. या काळ्या साडीत जान्हवी अप्सरापेक्षा कमी दिसत नाहीये. कर्ल्स केस, स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिक शेड्ससह तुमचा लुक पूर्ण करा.

तुमची इच्छा असेल तर तुम्ही जान्हवी कपूरसारख्या नेक्स्ट डोअर मुलीसारखा लूक ठेवू शकता. यासाठी तुम्ही छानसा छोटा फ्लोरल ड्रेस घालू शकता. जान्हवी कपूरचा हा लूक खूपच आकर्षक दिसत आहे.

जान्हवी कपूरप्रमाणेच या टोमॅटोच्या लाल रंगाच्या स्लिट ड्रेसमध्ये तुम्हीही कहर करू शकता.

 

WhatsApp channel