Things Related To Skin Care: चुकीच्या पद्धतीने चेहरा स्वच्छ केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. चेहरा स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे अनेकांना माहिती नसते. अनेक वेळा ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. पण त्या योग्य पद्धतीने केल्या नाहीतर त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला चेहरा स्वच्छ आणि चमकदार ठेवण्याविषयी काही गोष्टी सांगत आहोत. स्किन केअरमध्ये या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे.
१. जर तुम्ही स्किन केअरसाठी चांगले प्रोडक्ट वापरत असाल आणि सनस्क्रीन स्किप करत असाल तर चांगल्यातल्या चांगल्या स्किन केअर प्रोडक्टचा वापरही निरुपयोगी ठरतो.
२. जर तुम्ही आंघोळ करतानाच चेहरा स्वच्छ केला आणि नंतर दिवसभर स्वच्छ करायला विसरला तर ते चुकीचेआहे. दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा.
३. स्किन केअरमध्ये सॅलिसिलिक अॅसिड वापरा. ब्लॅकहेड्स आणि बंद छिद्रांसाठी हे सर्वोत्तम आहे.
४. तुमचे ब्युटी प्रोडक्ट नेहमी योग्य क्रमाने लावा. जर तुमची कोणतीही स्टेप चुकली तर तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाही.
५. त्वचा स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत दर आठवड्याला आपला फेस टॉवेल आणि उशाचे कव्हर धुवा आणि स्वच्छ करा.
६. काही लोकांना चेहऱ्याला वारंवार स्पर्श करण्याची सवय असते. जर तुम्हाला ही सवय असेल तर हे करू नका. त्वचेला वारंवार स्पर्श केल्याने त्याची चमक कमी होते.
७. जेव्हाही मेकअप काढता तेव्हा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.
८. आठवड्यातून किमान ३ वेळपेक्षा जास्त त्वचेला एक्सफोलिएट करू नका. यामुळे त्वचेवर एक्ने आणि पिंपल्स यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
९. त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. त्यामुळे पुरेसे पाणी प्या.
१०. साखर त्वचेसाठी हानिकारक आहे. यामुळे चेहरा नेहमी निस्तेज दिसतो. त्यामुळे साखर आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू टाळा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या