Ears Infection: जलतरणपटूंना होऊ शकते कानाच्या संसर्गाची समस्या, जाणून घ्या काय आहे स्वीमर्स इयर आजार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ears Infection: जलतरणपटूंना होऊ शकते कानाच्या संसर्गाची समस्या, जाणून घ्या काय आहे स्वीमर्स इयर आजार

Ears Infection: जलतरणपटूंना होऊ शकते कानाच्या संसर्गाची समस्या, जाणून घ्या काय आहे स्वीमर्स इयर आजार

Jun 10, 2024 11:47 PM IST

Swimmers Ear Disease: जलतरणपटू यांच्या कानात जास्त वेळ पाणी राहिल्याने इंफेक्शन होते. स्वीमर्स इअर हा आजार काय आहे, लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घ्या.

स्वीमर्स इयर आजार
स्वीमर्स इयर आजार

Ear Infection of Swimmers: स्वीमर्स इअर हा असा आजार आहे, ज्यात स्विमिंग करताना किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेल्याने इन्फेक्शन होते. जेव्हा कान जंतूंनी भरलेल्या पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा हे इन्फेक्शन होते. स्वीमर्स इअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते. कानाच्या संसर्गामुळे कानात वेदना होतात. ओटिटिस मीडिया ही कानातील मधल्या भागाची संसर्ग आहे. याला मिडल इअर इन्फेक्शन असेही म्हणतात. द एस्थेटिक क्लिनिकच्या कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी स्वीमर्स इयर या आजाराचे लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहे.

काय आहे स्वीमर्स इयर आजार

स्वीमर्स ईअर्स सारखी स्थिती कोणत्याही वयोगटात उद्भवू शकते. हे केवळ पोहणाऱ्या लोकांमध्येच नाही तर लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही दिसून येते. शॉवर घेताना किंवा आंघोळ करताना, केस धुताना किंवा ओलसर किंवा दमट वातावरणात पाणी किंवा ओलावा कानाच साचल्यास हा संसर्ग होतो. एखाद्याने कानाची जास्त स्वच्छता केली तेव्हा देखील हा संसर्ग दिसून येतो. जर तुम्हाला त्वचेसंबंधी समस्या असतील जसे की एक्जिमा किंवा सोरायसिस, तर तुम्हाला स्विमर्स इअर उद्भवण्याचा धोका अधिक असतो. धक्कादायक बाब म्हणजे इअरप्लग, इअरबड्स किंवा श्रवणयंत्र घातल्यानेही हा संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे कोणती?

स्विमर्स इअर हे मानसिकरित्या देखील त्रासदायक ठरु शकते. स्विमर्स इअरची लक्षणे म्हणजे कानातील वेदना, जे कानातला मळ बाहरे किंवा आत ढकलला जाताना तीव्र होतो. कानाच्या कालव्याच्या आत खाज सुटणे, दाब जाणवणे, कानात पाणी किंवा पू होणे, जळजळ आणि सूज यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होणे. या संसर्गाची इतर लक्षणे म्हणजे बाह्य कानाला लालसरपणा आणि सूज येणे. जर तुम्हाला तीव्र वेदना होत असतील, कानातून सतत पाणी येत असेल, ताप येत असेल किंवा तुमची लक्षणे सुधारत नसतील तर वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. संसर्गाचा सामना करण्यासाठी वेळीच निदान आणि योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे.

प्रतिबंध कसा कराल?

पोहल्यानंतर तुमचे कान कोरडे करा. कारण कान ओले ठेवल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. कानातील ओलसरपणा टाळण्यासाठी व अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी टॉवेलचा वापर करा. कानाच्या आत पाणी जाण्यापासून आणि वेदना आणि पुढील समस्यांपासून कानांचे संरक्षण करण्यासाठी पोहताना इअरप्लग घाला. तुमच्या कानाच्या आतील बाजूस कोणतेही नुकसान आणि वेदना टाळून कान स्वच्छ मऊ कापसाने पुसुन घ्या. कानाची स्वच्छता राखल्यास संसर्गापासून दूर राहण्यास मदत होते.

उपचार

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा, ज्यामुळे अस्वस्थतेपासून आराम मिळेल. क्लोरीनयुक्त स्विमिंग पूल, तलाव किंवा दूषित पाण्यात पोहणे टाळा जे संसर्गाची पुनरावृत्ती टाळण्यास मदत करू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner