Swiggi Order : स्वीगीवरून एका प्राणीप्रेमीने वर्षभरात मागवला १५ लाख रुपयाचा कुत्र्या, मांजरांसाठी खाऊ!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Swiggi Order : स्वीगीवरून एका प्राणीप्रेमीने वर्षभरात मागवला १५ लाख रुपयाचा कुत्र्या, मांजरांसाठी खाऊ!

Swiggi Order : स्वीगीवरून एका प्राणीप्रेमीने वर्षभरात मागवला १५ लाख रुपयाचा कुत्र्या, मांजरांसाठी खाऊ!

Dec 27, 2024 03:59 PM IST

Swiggy 2024 delivery: गजबजलेल्या मुंबई या शहरात स्विगी इन्स्टामार्ट हा मध्यरात्रीच्या क्रेव्हिंग्स, शेवटच्या क्षणाच्या अत्यावश्यक वस्तू आणि पावसाळ्यात आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी मागणीवरचा एकदम सोपा प्लॅटफॉर्म ठरला आहे.

Swiggy 2024
Swiggy 2024 (freepik)

How much Swiggy was used in Mumbai in 2024:  कधीही न झोपणाऱ्या, गजबजलेल्या या शहरात स्विगी इन्स्टामार्ट हा मध्यरात्रीच्या क्रेव्हिंग्स, शेवटच्या क्षणाच्या अत्यावश्यक वस्तू आणि पावसाळ्यात आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी मागणीवरचा एकदम सोपा प्लॅटफॉर्म ठरला आहे."भारताने २०२४ मध्ये स्विगीचा कसा वापर केला- स्विगी इन्स्टामार्ट आवृत्ती" या अहवालात या वर्षी कशा प्रकारे व्यवहार केला हे दिसून आले आहे. त्यात शहराची खास लय आणि ग्राहकांच्या वर्तनाचे प्रतिबिंब दर्शवणारे खरेदीचे वेगळे ट्रेंड्स पाहता येतात.

या अहवालाबाबत बोलताना स्विगी इन्स्टामार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश झा म्हणाले की, "सप्टेंबर २०२१ मध्ये सुरूवात केल्यापासून मुंबई शहराला वेगवान व्यवहाराची सोय खूप आवडल्याचे दिसून आले आहे. रोजच्या अत्यावश्यक गोष्टी, खेळणी, सौंदर्यप्रसाधने आणि सणांसाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे दहा मिनिटांत उपलब्ध होतात. शहरातील मोठ्या खरेदींमध्ये दूध, कांदा, दही, बटाटा आणि अंडी यांचा समावेश असतो. मात्र शहरातील एका ग्राहकाने फक्त पशुखाद्यावर १५,२३,८८५ रूपये खर्च केले आहेत.आज आपण स्विगीवरून कोणत्या वस्तूंची किती खरेदी झाली याबाबत जाणून घेऊया...

>पावसाळ्यातल्या अत्यावश्यक गोष्टी- पावसाळ्यातल्या अत्यावश्यक गोष्टी ऑर्डर करण्यात मुंबईने देशाचे नेतृत्व केले. या वेळी २०,००० छत्र्या आणि रेनकोट खरेदी केले गेले आहे.

>आइस्क्रीम- मुंबईने आइस्क्रीमच्या बॉक्सेसवर ४१ लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. पाऊस आणि आइस्क्रीम ही एक उत्तम जोडी आहे बहुदा.

>प्राण्यांचे लाड- शहरातल्या एका खऱ्या प्राणीप्रेमी व्यक्तीने पशुखाद्यावर तब्बल १५,००,००० रूपये खर्च केले आणि आपल्या प्राण्यांना चांगले खाणे आणि काळजी मिळेल यासाठी प्रयत्न केले. 

>मॅगी मॅनिया- मुंबईने २०२४ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॅगीची पाकिटे ऑर्डर केली. यावर ३२ कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. इतक्या पाकिटांत तर चाहत्यांनी खचाखच भरलेल्या ५० फुटबॉल स्टेडियमचे पोट भरू शकेल. मुंबईने खऱ्या अर्थाने आपली "मॅक्सिमम सिटी" प्रतिमा जपली. तसेच मुंबईकरांनी एकाच दिवशी टॉनिक वॉटरवर तब्बल ८ लाख रूपये खर्च केले.

>इलेक्ट्रॉनिक्स वस्तू- मुंबईकर खूप प्रॅक्टिकल आहेत. त्यांनी १२ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम इलेक्ट्रॉनिक्सवर खर्च केली आणि त्यामुळे या श्रेणीत बंगळुरू आणि दिल्लीनंतर तिसरा क्रमांक पटकावला. गॅजेट्सपासून ते पोकर चिप्सपर्यंत मुंबईकर प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या तयारीपासून ते शेवटच्या क्षणाच्या अत्यावश्यक वस्तूंपर्यंत आणि अगदी गॅजेट मॅनियापर्यंत मुंबईकरांनी अगदी स्टाइलमध्ये आपल्यासाठी सहज सोप्या मार्गाची निवड केली आहे. 

स्विगी इन्स्टामार्टबद्दलस्विगी इन्स्टामार्टची स्थापना ऑगस्ट २०२० मध्ये झाली असून तो भारताचा आघाडीचा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. सध्या ५४ शहरांमध्ये असलेल्या स्विगी इन्स्टामार्टकडून भारतीयांच्या घरात अवघ्या १०-१५ मिनिटांत किराणा माल आणि इतर रोजच्या अत्यावश्यक गोष्टी पोहोचवण्यासाठी स्विगीच्या उत्तम तंत्रज्ञानाचा आणि कटिबद्ध डिलिव्हरी भागीदारांचा वापर केला जातो. 

Whats_app_banner