मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sweet Potato With Milk: हिवाळ्यात आवर्जून खा दूध अणि रताळे, आहे हेल्दी नाश्ता!

Sweet Potato With Milk: हिवाळ्यात आवर्जून खा दूध अणि रताळे, आहे हेल्दी नाश्ता!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 23, 2024 09:18 AM IST

Healthy Breakfast: हिवाळ्यात आवर्जून रताळे खावीत. रताळे खाणे हा पारंपारिक नाश्ता आहे जो तुम्हाला दिवसभर पोटभर ठेवतो.

Sweet Potato With Milk are best breakfast
Sweet Potato With Milk are best breakfast (freepik)

Winter Breakfast Recipe: नाश्ता हा रोज आवश्य खावा. हिवाळ्यात तर नाश्ता आवर्जून करा. पण सकाळी जास्त वेळ नसतो. नाश्त्यात झटपट तयार होणाऱ्या रेसिपीचा शोध नेहमीच घेतला जातो. झटपट असूनही हा नाश्ता हेल्दी असावा असं प्रत्येकालच वाटतं. असाच एक नाश्ता असू शकतो. रताळे आणि दूध एकत्र करून खाल्ल्यास तुम्हाला फार फायदा होऊ शकतो. रताळे हे एक उच्च फायबर फळ आहे ज्याच्या सेवनाने तुमचे पोट भरण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत होते. याशिवाय हे खाल्ल्याने तुमचे पोट सतत भरलेले राहण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया दूध आणि रताळे खाण्याचे फायदे.

आहे हेल्दी नाश्ता

हा एक देसी नाश्ता आहे. या नाश्त्यामुळे पोट भरलेले राहते. याचे शरीराला खूप फायदे मिळतील. हे दोन्ही पदार्थ खाल्ल्याने तुमचा चयापचय दर आणि आतड्याची हालचाल सामान्य स्थितीत राहण्यास मदत होते. या कारणास्तव, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांसाठी देखील हा एक निरोगी नाश्ता आहे.

नाश्त्यात दूध आणि रताळे कसे खावेत?

रताळे उकडून नंतर सोलून घ्या. आता दूध गरम करून त्यात रताळे घाला. चांगले मॅश करा. लक्षात घ्या की साखर किंवा इतर काहीही घालण्याची गरज नाही. याशिवाय तुम्ही दूध आणि रताळ्याची खीर बनवून खाऊ शकता. हा एक अतिशय चवदार आणि आरोग्यदायी नाश्ता आहे.

याशिवाय रताळे विस्तवावर शिजवून त्यात मीठ आणि चाट मसाला टाकूनही तुम्ही खाऊ शकता. त्याची चव तुमचे मन प्रसन्न करेल. त्यामुळे जर तुम्हाला दूध नको असेल तर तुम्ही अशा प्रकारे नाश्त्यात रताळे खाऊ शकता.

WhatsApp channel