Sunday Special Recipe: नॉनव्हेज लव्हर्सला आवडेल दही चिकनची चटपटीत चव, रविवार खास बनवेल ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sunday Special Recipe: नॉनव्हेज लव्हर्सला आवडेल दही चिकनची चटपटीत चव, रविवार खास बनवेल ही रेसिपी

Sunday Special Recipe: नॉनव्हेज लव्हर्सला आवडेल दही चिकनची चटपटीत चव, रविवार खास बनवेल ही रेसिपी

Feb 25, 2024 12:14 PM IST

Nonveg Recipe: लंच असो वा डिनर सुट्टीच्या दिवशी बऱ्याच लोकांना नॉनव्हेज खायला आवडते. तुम्हाला सुद्धा रविवारी काही खास बनवायचे असेल तर तुम्ही दही चिकनची ही रेसिपी ट्राय करू शकता.

दही चिकन
दही चिकन (freepik)

Dahi Chicken Recipe: नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना चिकन खूप आवडते. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही वेगळ्या पद्धतीने चिकन बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. नेहमीचे चिकन करी बनवण्याऐवजी तुम्ही दही चिकनची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही बनवायला खूप सोपी आणि खायला टेस्टी आहे. सर्वांचा याची चटपटीत चव आवडेल. चला तर मग जाणून घ्या दही चिकनची रेसिपी.

दही चिकन बनवण्यासाठी साहित्य

- १/२ किलो चिकन

- १ कप दही

- ३ कांदे चिरलेले

- १ इंच आल्याचा तुकडा

- ७-८ लसूण पाकळ्या

- ३ लवंगा

- १ मोठी वेलची

- ४ हिरव्या वेलची

- ६-७ काळ्या मिरी

- २ तुकडे दालचिनी

- २ टीस्पून खसखस

- ५-६ काजू

- ५-६ बदाम

- २ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून हळद

- १/२ टीस्पून गरम मसाला

- १/२ टीस्पून धने पावडर

- तेल

- चवीनुसार मीठ

दही चिकन बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही घ्या. आता त्यात एक चमचा तिखट, हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि मीठ घालून मिक्स करा. आता या मिश्रणात चिकनचे तुकडे घाला. दही चिकन २-३ तास मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवा. आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात चिकनचे तुकडे टाकून तळून घ्या. आता हे बाजूला ठेवा. आता या गरम तेलात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. आता तळलेला कांदा मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. नंतर मिक्सरमध्ये लसूण, आले, काळी आणि हिरवी वेलची, दालचिनी, काळी मिरी आणि लवंगा यांची पेस्ट बनवा. यानंतर खसखस, बदाम आणि काजू सुद्धा ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. आता कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात लसूण-आले पेस्ट, तिखट, धनेपूड, गरम मसाला पावडर आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर मसाल्यामध्ये कांद्याची पेस्ट आणि दही घालून १० मिनिटे शिजवा. 

आता ग्रेव्हीमध्ये खसखसची पेस्ट घाला. आता त्यात तळलेले चिकन घालून मिक्स करा. चिकनमध्ये २ कप पाणी घाला. यावर झाकण ठेवा आणि १० मिनिटे शिजू द्या. चिकन शिजल्यावर गॅस बंद करा. तुमचे दही चिकन तयार आहे.

Whats_app_banner