Dhaba Style Paneer Masala Recipe: रविवारच्या सुट्टीच्या दिवशी जेवणासाठी खास बेत बनवले जातात. त्यातही पनीरचे विविध पदार्थ आवडीने बनवले आणि खाल्ले जातात. पनीरसोबत अनेक प्रकारच्या भाज्या तयार करता येतात. तुम्हाला सुद्धा संडे लंचसाठी काही खास आणि टेस्टी बनवायची इच्छा असेल तर तुम्ही पनीर मसाला बनवू शकता. घरच्या घरी ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवणे खूप सोपे आहे. शिवाय ही रेसिपी टेस्टी असून मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना सुद्धा आवडेल. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे ढाबा स्टाईल पनीर मसाला
- पनीर
- २ टीस्पून बेसन
- २ मध्यम कांदे
- ४ ते ५ मध्यम टोमॅटो
- १/४ टीस्पून हळद
- १ टीस्पून मीठ
- ३ टीस्पून तिखट
- १ टीस्पून धने पावडर
- १ टीस्पून जिरे पूड
- १/ २ चमचे साखर
- तेल आणि तूप
- कसुरी मेथी
हे बनवण्यासाठी एक कढई घ्या आणि त्यात तेलासह तूप घालून गरम करा. नंतर संपूर्ण मसाले, जिरे आणि तमालपत्र घाला. नंतर काही वेळाने त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. नंतर आले लसूण पेस्ट घालून परता. चांगले भाजल्यानंतर त्यात किसलेले टोमॅटो घालून ५ मिनिटे चांगले शिजू द्यावे. थोडा वेळ शिजल्यानंतर त्यात हळद, मीठ, लाल तिखट, जिरे पूड आणि धने पूड घाला. चांगले मिक्स करा आणि ग्रेव्हीपासून तेल वेगळे होईपर्यंत शिजवा. तेल वेगळे व्हायला लागल्यावर त्यात बेसन घालून पुन्हा मिक्स करा. थोड्या वेळाने एक कप पाणी घालून ग्रेव्ही मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवा.
शिजल्यानंतर त्यात मीठ आणि साखर घालून मिक्स करा. आता त्यात गरम मसाला घालून मिक्स करा आणि मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा. गॅस बंद केल्यानंतर थोडी कसुरी मेथी बारीक करून भाजीत घाला. कोथिंबीर आणि फ्रेश क्रिमने गार्निश करून सर्व्ह करा.
संबंधित बातम्या