Homemade Kulfi Recipe: उन्हाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी, कोल्ड ड्रिंक्स असे थंड पदार्थ घ्यायला आवडतात. अनेक लोक रात्री जेवणानंतर आईस्क्रीम, कुल्फी आवर्जून खातात. हे फक्त तुम्हाला थंडावा देत नाही तर घरी बनवलेली आईस्क्रीम, कुल्फी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेल्या कुल्फी आणि आईस्क्रिममध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटेशियम, झिंक सारखे अनेक पोषकतत्त्व असतात. अनेक महिलांनी घरी कुल्फी बनवणे अवघड वाटते. या रेसिपीने तुम्ही सोप्या पद्धतीने कुल्फी बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी कुल्फी बनवण्याची सोपी पद्धत
- दूध
- क्रीम
- मिल्क पावडर
- काजू
- पिस्ता
- बदाम
- वेलची
- साखर
- केसर
होममेड कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम दूधात क्रीम आणि मिल्क पावडर मिक्स करून मंद आचेवर ठेवा. आता यात काजू, पिस्ता, बदाम टाकून मिक्स करा. दूध चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवा. यानंतर ते गॅसवरून खाली उतरवून थोडे थंड होण्यासाठी ठेवा. दूध थंड झाल्यावर कुल्फीच्या साच्यात भरून साधारण ४ ते ५ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. ठराविक वेळेनंतर तुमची टेस्टी कुल्फी तयार आहे. थंडगार सर्व्ह करा.
संबंधित बातम्या