Sabudana Falooda Recipe: उन्हाळ्याच्या कडक उन्हात थंडगार आईस्क्रीम, ड्रिंक्स, फालुदा असे विविध पदार्थ खाण्याकडे लोकांना अधिक कल असतो. रात्रीचे जेवण झाल्यानंतर डेझर्टमध्ये आईस्क्रीम, फालुदा आवडीने खाल्ले जाते. तुम्ही सुद्धा घरी फालुदा बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी साबुदाणा फालुदाची ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आणि जास्त वेळ लागत नाही. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या कसा बनवायचा साबुदाणा फालुदा.
- ४ कप पाणी
- अर्धा कप साबुदाणा
- ३ कप दूध
- दोन चमचे रुह अफजा किंवा रोझ सिरप
- एक चमचा रूह अफजा किंवा रोझ सिरप
- दोन चमचे सब्जाच्या बिया
- दोन चमचे स्ट्रॉबेरी जेली
- बारीक चिरलेले नट्स
- एक चमचा व्हॅनिला आईस्क्रीम
- एक चमचा तुटी फ्रूटी
सर्वप्रथम साबुदाणा पाण्यात भिजवा. दोन ते तीन तासात भिजल्यावर गाळून कढईत टाका. आता चार कप पाणी घालून दहा मिनिटे शिजवा. साबुदाणा पूर्णपणे पारदर्शक दिसू लागेपर्यंत शिजवा. साबुदाणा पूर्णपणे शिजला आणि पारदर्शक दिसू लागला की पाणी गाळून वेगळे करा. नंतर साबुदाणा थंड पाण्याने धुवा, म्हणजे सर्व स्टार्च बाहेर पडून चिकटणार नाही. तुमचा साबुदाणा तयार असून बाजूला ठेवा.
अर्धा लिटर दूध एका पातेल्यात घेऊन उकळवा. मंद आचेवर शिजू द्या. थोडा वेळ शिजल्यावर थंड करा. आता थंड दुधात रुह अफजा किंवा रोझ सिरप घाला आणि मिक्स करा.
साबुदाणा फालुदा बनवण्यासाठी लांब, उंच काचेचा ग्लास घ्या. त्यात एक चमचा रुह अफजा किंवा रोझ सिरप घाला. तसेच दोन चमचे सब्जाच्या बिया घाला. आता दोन चमचे तयार साबुदाणा घाला आणि दोन चमचे स्ट्रॉबेरी जेली मिक्स करा. बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता किंवा आवडते नट्स घाला. आता ग्लासमध्ये एक कप थंड तयार गुलाब दूध घाला. वर व्हॅनिला आइस्क्रीम घाला. आता बारीक चिरलेले नट्स, टुटी फ्रुटी आणि चेरीने सजवा. तुमचा फालुदा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
संबंधित बातम्या