Tasty Jaljeera Recipe: उन्हाळा सुरू होताच लोक पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करायला लागतात. अशा गोष्टींमध्ये जलजीराही समाविष्ट आहे. जलजीरा चविष्ट असण्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदेही देते. जलजीरा अँटी- ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत असण्यासोबतच पचनक्रियाही उत्तम ठेवतो. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे व्यक्तीला अनेक आजार होऊ लागतात. अशा परिस्थितीत या उन्हाळ्यात जलजीरा प्यायल्याने आतड्यांतील गॅस, अस्वस्थता, चक्कर येणे, पोटात मुरडा येणे, उलट्या होणे, मासिक पाळीत क्रॅम्प येणे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात आरोग्य आणि चव या दोन्हींची काळजी घेणारा जलजीरा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
- १/२ कप पुदिन्याची पाने
- १/२ कप कोथिंबीर
- १/२ इंच आल्याचा तुकडा
- २ चमचे ताजा लिंबाचा रस
- १/२ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर
- १/४ टीस्पून हिंग
- २ टीस्पून काळे मीठ
- १/२ टीस्पून मीठ
- १/४ टीस्पून काळी मिरी पावडर
- १ टीस्पून साखर
- २ टीस्पून आमचूर पावडर
- १ टीस्पून चिंचेची पेस्ट
- ४ कप थंड पाणी
जलजीरा बनवण्यासाठी प्रथम पुदिन्याची पाने, कोथिंबीर, आले आणि दीड कप पाणी ब्लेंडरमध्ये घालून सर्व साहित्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. ही बेस्ट चांगली बारीक झाल्यावर काचेच्या भांड्यात काढा. आता एका भांड्यात लिंबाचा रस, भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, काळे मीठ, साधे मीठ, काळी मिरी पावडर, साखर, आमचूर पावडर आणि चिंचेची पेस्ट मिक्स करा. त्याच भांड्यात उरलेले साडे तीन कप पाणी घालून सर्व काही चांगले मिक्स करा. आता मीठ, लिंबाचा रस आणि चिंचेची पेस्ट एकदा चेक करा. आवश्यक असल्यास तुम्ही त्यांचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.
जलजीराची चव वाढवण्यासाठी सर्व्ह करण्यापूर्वी ३ ते ४ तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर एका ग्लासमध्ये बर्फाचे काही तुकडे टाका, त्यात जलजीरा घाला आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या