Summer Special Drink: उन्हाळ्यात तुम्हाला थंड ठेवेल मोहब्बत का शरबत, नोट करा रिफ्रेशिंग रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special Drink: उन्हाळ्यात तुम्हाला थंड ठेवेल मोहब्बत का शरबत, नोट करा रिफ्रेशिंग रेसिपी

Summer Special Drink: उन्हाळ्यात तुम्हाला थंड ठेवेल मोहब्बत का शरबत, नोट करा रिफ्रेशिंग रेसिपी

Published May 14, 2024 08:53 PM IST

Summer Special Drink Recipe: मोहब्बत का शरबत हे एक प्रसिद्ध उन्हाळी ड्रिंक आहे, जे टरबूजाचे तुकडे आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरून तयार केले जाते. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी

मोहब्बत का शरबतची रेसिपी
मोहब्बत का शरबतची रेसिपी ( pinterest)

Mohabbat Ka Sharbat Recipe: कडक ऊन आणि उष्णतेपासून झटपट आराम मिळवण्यासाठी लोक अनेकदा विविध प्रकारच्या देसी पेयांचा आधार घेतात. ही ड्रिंक्स उष्णतेपासून आराम तर देतातच पण पोटासाठीही चांगली मानली जातात. अशाच एका जबरदस्त ड्रिंकचे नाव आहे मोहब्बत का शरबत. मोहब्बत का शरबत हे जुन्या दिल्लीचे प्रसिद्ध समर ड्रिंक आहे, जे टरबूजाचे तुकडे आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरून तयार केले जाते. हे घरी बनवणे खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे रिफ्रेशिंग मोहब्बत का शरबत

मोहब्बत का शरबत बनवण्यासाठी साहित्य

- २ कप थंड दूध

- १/४ कप साखर

- ३ चमचे गुलाब सिरप

- १ कप ताज्या टरबूजाचा रस

- १ कप बारीक चिरलेला टरबूजचे तुकडे

- १ कप थंड पाणी

- २०-२५ बर्फाचे तुकडे

- १०-१५ ताज्या गुलाबाच्या पाकळ्या

मोहब्बत का शरबत बनवण्याची पद्धत

मोहब्बत का शरबत बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात दूध, साखर आणि गुलाब सिरप घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत दूध ढवळत राहा. यानंतर त्यात टरबूजाचा रस, टरबूजाचे तुकडे आणि थंड पाणी घालून सर्व काही पुन्हा एकदा चांगले मिक्स करा. यानंतर बर्फाचे तुकडे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून शरबत सर्व्हिंग ग्लासमध्ये घाला आणि पाहुण्यांना थंडगार सर्व्ह करा.

Whats_app_banner