Mango Shake Recipe: उन्हाळा सुरू होताच फळांचा राजा आंबा बाजारात सर्वत्र दिसू लागतो. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चव लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते. उन्हाळ्यात आंब्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. पण मँगो शेकची गोष्ट अनोखी आहे. मँगो शेकचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळ्यात मँगो शेक शरीरात दीर्घकाळ ऊर्जा आणि थंडपणा टिकवून ठेवण्यास मदत करतो. हे उन्हाळ्यातील सर्वात आवडते आणि रिफ्रेशिंग ड्रिंकपैकी एक मानले जाते, जे तुम्ही घरी सहज तयार करू शकता. मँगो शेकची गोड चव आणि मलईदार टेक्स्चर केवळ तुमची भूकच भागवत नाही तर तुमची गोड क्रेविंग पूर्ण करण्यास मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊया घरी कसा बनवायचा टेस्टी मँगो शेक.
- २ पिकलेले आंबे
- २ कप दूध
- १ टीस्पून ड्राय फ्रूट्स
- ३ टेबलस्पून साखर
- ६ ते ७ बर्फाचे तुकडे
मँगो शेक बनवण्यासाठी आधी आंबे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर आंबा पाण्यातून काढून त्याची साल काढून घ्या. आता आंब्याच्या गराचे तुकडे एका भांड्यात ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे आणि १ वाटी थंड दूध व साखर घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करा. मँगो शेकचा टेक्स्चर गुळगुळीत असावा याची विशेष काळजी घ्यावी. यानंतर मँगो शेक एका भांड्यात काढून त्यात १ कप दूध घालून मिक्स करा. जर शेक खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.
यानंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये मँगो शेक घाला आणि त्यावर ३-४ बर्फाचे तुकडे आणि ड्रायफ्रूट स्लाइसने सजवा. तुमचा टेस्टी मँगो शेक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
संबंधित बातम्या