Litchi Shake Recipe: उन्हाळ्यातील आहाराच्या बाबतीत असे म्हटले जाते की कमी खा आणि जास्त प्या. म्हणजेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी अन्नापेक्षा पेयांकडे अधिक लक्ष देणे हा आहे. लिंबू पाणी, ज्यूस, नारळ पाणी, लस्सी यासारख्या गोष्टी या काळात प्याव्यात. आज आम्ही तुम्हाला लिचीच्या अशाच एका ड्रिंकबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला खूप आवडेल. उन्हाळ्यात मिळणाऱ्या विविध फळांचे ज्यूस, शेक लोक आवडीने पितात. तुम्हाला सुद्धा फळांचे शेक प्यायला आवडत असेल तर लिची शेक नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी असून, लवकर तयार होते. चला तर जाणून घेऊया कसे बनवायचे लिची शेक.
- लिची ५०० ग्रॅम
- १ कप पाणी
- १ चमचा लिंबाचा रस
- १ चमचा काळे मीठ
- अर्धी वाटी साखर
- अर्धा चमचा काळी मिरी पावडर
लिची शेक बनवण्यासाठी प्रथम लिची सोलून घ्या. त्यातील बिया काढून टाका आणि गर वेगळा करा. यानंतर मिक्सरमध्ये लिचीचा गर, पाणी, साखर घालून ब्लेंड करा. आता लिचीच्या शेकमध्ये काळे मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घाला. पुन्हा एकदा ब्लेंड करून सर्व नीट मिक्स करा. यानंतर एका भांड्यात लिची शेक काढून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. नंतर एका ग्लासमध्ये तयार केलेला लिची शेक टाका. त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि थंडगार सर्व्ह करा.