मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shake Recipe: संध्याकाळी चहा- कॉफी ऐवजी प्या टेस्टी बदाम शेक, पाहा झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

Shake Recipe: संध्याकाळी चहा- कॉफी ऐवजी प्या टेस्टी बदाम शेक, पाहा झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

Jun 18, 2024 07:06 PM IST

Summer Special Drink: आरोग्यासाठी बदामचे फायदे तर तुम्हाला माहीत असतील. तुम्ही यापासून टेस्टी बदाम शेक सहज बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी

बदाम शेक रेसिपी
बदाम शेक रेसिपी (freepik)

Badam Shake Recipe: उन्हाळ्यात संध्याकाळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी काहीतरी कोल्ड ड्रिंक्स प्यायला सर्वांनाच आवडते. संध्याकाळी कोल्ड कॉफी, लस्सी किंवा फळांचे ज्यूस असे ड्रिंक आवडीने प्यायले जातात. तुम्हाला काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही बदाम शेक बनवू शकता. बदाम हे कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. याशिवाय त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, कॉपर, फायबर आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बदाम पासून बनवलेले हे शेक फक्त टेस्टीच नाही तर हेल्दी देखील आहे. विशेष म्हणजे बदाम शेकची रेसिपी सोपी असून झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या बदाम शेकची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

बदाम शेक बनवण्यासाठी साहित्य

- दूध

- बदाम

- कस्टर्ड पावडर

- साखर

- वेलची

- ड्राय फ्रूट्स

बदाम शेक बनवण्याची पद्धत

बदाम शेक बनवण्यासाठी प्रथम बदाम आणि वेलची भिजवावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दूध चांगले उकळायला ठेवा. नंतर एका छोट्या भांड्यात थोडे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर घाला. आता या कस्टर्ड पावडरचे मिश्रण उकळत्या दुधात मिक्स करा. आता या दुधात साखर घाला. नंतर भिजवलेले बदामची साल काढून घ्या. बदाम आणि वेलची यात थोडे दूध घालून ते बारीक करा. आता ही बदाम वेलचीची पेस्ट उकळत्या दुधात टाका आणि नीट मिक्स करा. आता दूध घट्ट होऊ द्या. आता त्यात कापलेले बदाम घाला. हे दूध थंड झाल्यावर वरून बदामाने सजवा आणि सर्व्ह करा.

WhatsApp channel
विभाग