Tan Removal Face Scrub: प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. जे लोक रोज बाहेर जातात त्यांनी त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते, विशेषतः उन्हाळ्यात. योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेवर टॅनिंग, पिंपल्स, डाग, आणि काळेपणा यासारख्या समस्या उद्भवतात. अशा स्थितीत त्वचेच्या काही समस्या स्क्रबिंगने दूर केल्या जाऊ शकतात. चेहरा स्क्रब करणे खूप महत्वाचे आहे. त्वचेवर साचलेली धूळ आणि ब्लॅकहेड्स सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही घरच्या घरी स्क्रब फेस पॅक तयार करू शकता. हे नैसर्गिकरित्या तयार केले जात असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहे. चला तर मग जाणून घ्या कसा बनवयचा हा फेस पॅक आणि कसा वापरायचा.
हा स्क्रब फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे...
- एक चमचा तांदळाचे पीठ
- एक चमचा रान हळद किंवा जंगली हळद
- दोन चमचे मध
हा फेस स्क्रब बनवण्यासाठी सर्व साहित्य नीट मिक्स करा आणि स्मूद पेस्ट बनवा. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा. हा फेस स्क्रब सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगला आहे. फक्त तुमच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा पिंपल्स असतील तर हे अजिबात लावू नका.
तुम्ही हा पॅक चेहऱ्यासोबतच हात आणि पायांवर सुद्धा लावू शकता. हा पॅक लावल्यानंतर साधारण २० मिनिटे राहू द्या. आता थोडं पाणी घेऊन हळूहळू चोळा. पाण्याच्या मदतीने पॅक हळूहळू काढून टाका. चेहरा, हात आणि पाय नीट धुवून घ्या. धुतल्यानंतर भरपूर मॉइश्चरायझर लावा.
- एक्सफोलिएशनमुळे त्वचेला अनेक फायदे होतात. तांदळाच्या पिठापासून बनवलेला हा फेस पॅक त्वचा स्वच्छ करेल.
- हा फेस पॅक लावल्याने चेहऱ्याची चमक वाढते.
- हा फेस पॅक टॅन दूर करण्यात मदत करतो.
- पॅक बनवण्यासाठी मधाचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचा मऊ होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)