Home Remedies for Face Burning: अति उष्णतेमध्ये घाम येणे अगदी सामान्य आहे. कारण घाम येणे शरीराचे तापमान नियंत्रित करते. जेव्हा हा घाम त्वचेच्या पृष्ठभागाखाली ब्लॉक होतो. त्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर जळजळ होत असेल तर ती दूर करण्यासाठी छोट्या छोट्या घरगुती उपायांची मदत घ्या. त्वचेची जळजळ आणि खाज दूर तर होईलच पण यासोबतच उष्णतेमुळे येणाऱ्या पुरळ, घामोळ्या सुद्धा कमी होतील.
तुळशीच्या पानांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. जेव्हा तुम्ही ते त्वचेवर लावता तेव्हा संसर्ग आणि बॅक्टेरियाची समस्या दूर होते आणि त्वचेला थंडपणा येतो. तुळशीचे पाणी बनवण्यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळवून थंड करा. हे पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटल मध्ये भरून चेहऱ्याला लावा.
उन्हाळ्यात चंदन शरीराला थंडावा देते. चंदन बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची जळजळ दूर होते. उन्हाळ्यात त्वचेसाठी चंदन उत्तम म्हटले जाते.
कोरफडीच्या झाडाची पाने घ्या आणि त्याचा गर काढा. या गरमध्ये गुलाब जल मिक्स करा आणि नंतर चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेच्या जळजळीपासून आराम मिळेल. त्वचेसाठी एलोवेरा जेल खूप चांगले असून उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होऊ शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या