Tips to Protect Skin Dryness: एसीमुळे उन्हाळ्यात खूप आराम मिळतो. पण सतत तासन तास एअर कंडिशनमध्ये बसल्यास त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. सतत एसीच्या तापमानामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्यावर फक्त कोरडेपणाच दिसत नाही तर इतरही अनेक समस्या दिसू लागतात. एसीचा तुमच्या त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर हा घरगुती उपाय नक्की करून पहा.
सतत एसीमध्ये तासन् तास बसल्याने त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचा तिचा नैसर्गिक ओलावा गमावू लागते आणि लवचिकता गमावते. त्यामुळे वयाच्या आधी त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेवरील हे वाईट परिणाम कमी करण्यासाठी त्वचेला हायड्रेट करणे आवश्यक आहे. त्वचा हायड्रेट करण्यासाठी या टोनरची मदत घ्या.
एसीमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी हायड्रेटिंग मिस्टची मदत घ्या. हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते. हे हायड्रेटिंग फेस मिस्ट बनवायला खूप सोपे आहे आणि ते घरी सहज बनवता येते. फक्त या तीन गोष्टींची आवश्यकता असेल.
- वाळलेली गुलाबाच्या पाकळ्या
- ग्लिसरीन
- पाणी
गुलाबाची कोरडी पाने स्प्रे बॉटल मध्ये ठेवा. बॉटलचा अंदाजे एक तृतीयांश भाग ग्लिसरीनने भरा. उरलेली बॉटल पाण्याने भरून ठेवा. नीट ढवळून घ्या. दिवसातून तीन ते चार वेळा हे फेस मिस्ट चेहऱ्यावर हळूवारपणे स्प्रे करा. ते तसेच राहू द्या. यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल.
ग्लिसरीन त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करते. त्यामुळे त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होते. त्याच वेळी गुलाबाच्या पाकळ्या त्वचेतील पीएच पातळी संतुलित करतात आणि छिद्र घट्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे त्वचा घट्ट आणि गुळगुळीत दिसते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)