मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coffee Face Pack: चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणू शकतो कॉफी फेस पॅक, डागही होतील दूर

Coffee Face Pack: चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणू शकतो कॉफी फेस पॅक, डागही होतील दूर

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 13, 2024 03:38 PM IST

Summer Skin Care Tips: तुम्हालाही घरबसल्या तुमचा हरवलेला रंग परत मिळवायचा असेल तर हा कॉफी फेस पॅक तुम्हाला मदत करू शकतो. ते बनवण्याची आणि लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया.

चेहऱ्याची चमक परत मिळवण्यासाठी कॉफी फेस पॅक
चेहऱ्याची चमक परत मिळवण्यासाठी कॉफी फेस पॅक (freepik)

Coffee Face Pack For Glowing Skin: जर वाढणारे तापमान आणि कडक उन्हामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग निस्तेज झाला असेल, तर हा कॉफी फेस पॅक तुम्हाला या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. होय, उन्हाळ्याच्या कडक उन्हात सनबर्न सुद्धा एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे त्वचा जळलेली आणि निस्तेज दिसू लागते. हे सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेवर पडल्यामुळे होते. तथापि सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लोक अनेक प्रकारचे फेस पॅक आणि घरगुती उपायांचा अवलंब करतात. असे असूनही अनेक वेळा समस्या जैसे थेच राहते. तुम्हालाही घरच्या घरी तुमचा हरवलेला रंग परत मिळवायचा असेल, तर हा कॉफी फेस पॅक तुम्हाला मदत करू शकतो. हे घरी बनवणे आणि लावणे सोपे असून त्याचा फायदा होतो. चला तर हा कॉफी फेस पॅक बनवण्याची आणि लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

कॉफी फेस पॅक बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य

- एक चमचा कॉफी पावडर

- एक चमचा हळद

- एक चमचा साखर पावडर

- एक चमचा एलोवेरा जेल

कॉफी फेस पॅक बनवण्याची पद्धत

कॉफी फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत कॉफी पावडर, हळद, साखर पावडर आणि एलोवेरा जेल घ्या. हे सर्व नीट मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. तुमचा कॉफीचा फेस पॅक तयार आहे.

कॉफी फेस पॅक लावण्याची पद्धत

हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा नीट धुवून पुसून घ्या. आता तयार केलेली कॉफीची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून चेहरा पूर्णपणे स्क्रब करा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा. हा कॉफी फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावावा लागेल. असे केल्याने तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारेल आणि डागही सहज दूर होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel