Watermelon For Skin: चेहऱ्यावर टरबूज लावल्याने होईल फायदा, चमकदार त्वचेसाठी असे लावा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Watermelon For Skin: चेहऱ्यावर टरबूज लावल्याने होईल फायदा, चमकदार त्वचेसाठी असे लावा

Watermelon For Skin: चेहऱ्यावर टरबूज लावल्याने होईल फायदा, चमकदार त्वचेसाठी असे लावा

May 15, 2024 01:18 PM IST

Summer Skin Care Tips: फळ त्वचेवर लावणे खूप फायदेशीर असते. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेवर टरबूज कसे लावायचे ते येथे पहा.

ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी चेहऱ्यावर टरबूज लावण्याची पद्धत
ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी चेहऱ्यावर टरबूज लावण्याची पद्धत (freepik)

Tips to Apply Watermelon on Face for Glowing Skin: उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता. उन्हाळ्यात त्वचेला उन्हाचा दाह आणि घामाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्वचा तेलकट होते आणि त्वचेवर पुरळ आणि जळजळही होऊ लागते. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही टरबूज वापरू शकता. उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी टरबूज खाल्ले जाते. पण हे फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर ते आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. टरबूजमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात. हे त्वचेला डीप क्लीन करण्यास देखील मदत करू शकते. चेहऱ्यावर टरबूज लावल्याने अनेक फायदे मिळतात. टरबूज त्वचेवर कसे लावायचे ते येथे पहा

ऑइली स्किनसाठी कसा बनवायचा टरबूजचा फेस पॅक (Watermelon Face Pack for Oily Skin)

उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या असतात, काही लोकांना तेलकट त्वचेची समस्या असते. अशा परिस्थितीत तुम्ही टरबूजचा फेस पॅक बनवू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा मध आणि अर्धा कप टरबूज यांची पेस्ट बनवा. ही तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून साधारण १५ मिनिटे राहू द्या. हा फेस पॅक त्वचेसाठी खूप चांगला आहे. ते चेहरा स्वच्छ आणि मऊ करते.

ड्राय स्किनसाठी कसा बनवायचा टरबूजचा फेस पॅक (watermelon face pack for dry skin)

ज्यांची त्वचा कोरडी आहे ते दही आणि टरबूज एकत्र करून फेस पॅक बनवू शकतात. टरबूज आणि दही मिक्स करून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. नंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर मास्कसारखा लावा. दही डेड स्किन काढून टाकते आणि त्वचेला खोलवर पोषण देते. हा फेस पॅक लावल्याने त्वचा चमकदार होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner