मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy Heart: वाढत्या तापमानामुळे वाढू शकते हृदयाशी संबंधित समस्या, उन्हाळ्यात या टिप्सने हेल्दी ठेवा हार्ट

Healthy Heart: वाढत्या तापमानामुळे वाढू शकते हृदयाशी संबंधित समस्या, उन्हाळ्यात या टिप्सने हेल्दी ठेवा हार्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 21, 2024 09:34 PM IST

Summer Health Care Tips: उन्हाळ्यात खूप उष्णता असते आणि जास्त वेळ उष्णतेमध्ये राहिल्याने हायपरटेन्शन आणि ब्लड फ्लो वाढण्याचा धोका वाढतो. या ऋतूमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी अशा प्रकारे स्वतःची काळजी घ्यावी

उन्हाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी टिप्स
उन्हाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips for Healthy Heart in Summer: राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अशा परिस्थितीत दिवसा घराबाहेर पडणे कठीण होते. हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी हा ऋतू खूप कठीण असू शकतो. खरं तर उन्हाळ्याच्या दिवसात काही लोक हृदयाशी संबंधित बहुतेक समस्यांना उष्माघात मानतात. तर उन्हाळ्यात हार्ट पेशंटना उलट्या, थकवा, डोकेदुखी, भ्रम, स्नायू दुखणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या हृदयाचे रक्षण करू शकता. हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी काय करावे हे येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

हायड्रेटेड रहा

उन्हाळ्यात तापमान खूप जास्त राहते. या काळात हायड्रेशन राखणे खूप महत्वाचे आहे. कारण संपूर्ण हृदयाच्या आरोग्यास चालना देण्यासाठी ते आवश्यक आहे. दिवसभर पाणी प्यायल्याने तहान तर शमतेच पण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. टाइमर सेट करा आणि पाणी प्या किंवा फळांचा ज्यूस प्या. सोडा, अल्कोहोल आणि कॅफिनपासून दूर रहा. अति प्रमाणात मद्यपान केल्याने उष्माघाताचा धोकाही वाढतो.

हेल्दी अन्न निवडा

सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश करा. जास्त तिखट, मसाले असलेले अन्न खाऊ नका. याशिवाय तुमच्या आहारात सूप, सॅलड आणि फळांचा नक्कीच समावेश करा. यामुळे शरीर निरोगी राहते आणि पचनाच्या समस्याही दूर राहतात.

स्मार्ट व्यायाम करा

उष्णतेच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि आपल्या दिनचर्येत नियमित शारीरिक हालचालींचा समावेश करा. अशा परिस्थितीत व्यायामासाठी दिवसातील थंड वेळ निवडा. जर तापमान वाढले तर जास्त व्यायाम करू नका.

थंड राहा

जर तापमान जास्त असेल तर आपण त्याच्याशी दीर्घकाळ संपर्क टाळावा. कारण यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत पंखे, एअर कंडिशनिंग किंवा कोल्ड कॉम्प्रेस यासारख्या गोष्टींचा वापर करा. उन्हाळ्याच्या काळात स्वतःला थंड ठेवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे रक्त प्रवाह योग्य राखण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel