मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Fashion Tips: उन्हाळ्यात नेसा या फॅब्रिकची साडी, कंफर्टसोबतच मिळेल स्लिम लुक

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात नेसा या फॅब्रिकची साडी, कंफर्टसोबतच मिळेल स्लिम लुक

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 13, 2024 08:29 PM IST

Fashion Tips: जर तुम्हाला साडी नेसून स्लिम आणि फिट दिसायचे असेल तर ऑर्गेन्झा, सिल्क किंवा टाइट कॉटन घालू नका. त्याऐवजी या फॅब्रिकपासून बनवलेल्या साड्या तुम्हाला स्लिम आणि फिट दिसण्यासाठी अधिक मदत करतील.

स्लिम लूकसाठी साडीचे फॅब्रिक
स्लिम लूकसाठी साडीचे फॅब्रिक

Saree Fabric for Slim Look: प्रत्येक मुलीला स्लिम दिसायचे असते. पण प्रत्येकाचे शरीर सारखेच असेल असे नाही. पण कपडे नीट परिधान करून तुम्ही स्वतःला स्टायलिश आणि फिट दाखवू शकता. साडी नेसायला आवडते पण साडीत अजूनच लठ्ठ दिसता, तर नेहमी या फॅब्रिकच्या साड्या निवडा. ते नेसल्याने तुम्ही केवळ स्टायलिशच दिसत नाही तर ते खूपच आरामदायक देखील दिसतील. चला तर मग जाणून घेऊया कोणते साडी फॅब्रिक तुमचा लुक आणखी आकर्षक बनवू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

जॉर्जेट फॅब्रिकची साडी

ही अतिशय सुरेख फॅब्रिक आहे. या फॅब्रिकच्या साड्या तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवल्या तर त्या तुम्हाला स्लिम आणि फिट दिसण्यास मदत करतील. त्याशिवाय त्या नेसणे देखील खूप सोपे आहे आणि ते कॅरी करणे देखील खूप सोपे आहे.

शिफॉन साडी

शिफॉनची साडी जवळपास प्रत्येक मुलीची आवडती असते. वजनाने हलकी असण्यासोबतच ती नेसल्याने तुम्ही तरुण दिसाल आणि थोडे सडपातळही दिसाल. शिफॉनच्या साड्या शरीरावर सहज बसतात आणि त्यांचे प्लीट्सही व्यवस्थित तयार होतात. विशेषत: उन्हाळ्यात शिफॉनच्या साडीत तुम्हाला आरामदायक वाटेल.

क्रेप सिल्क

तुम्हाला सिल्कच्या साड्या आवडत असतील तर रेग्युलर सिल्क कधीही निवडू नका. यात तुम्ही आणखी लठ्ठ दिसू शकता. त्याऐवजी स्वतःसाठी क्रेप सिल्क निवडा. एक चमकदार फॅब्रिक असल्याने ते शरीरावर एक इल्युजन इफेक्ट निर्माण करते. या साडीचा फॉल खूप चांगला आहे आणि ती नेसल्याने तुम्ही स्लिम दिसाल.

सॉफ्ट कॉटन

हा उन्हाळ्याचा ऋतू आहे आणि वॉर्डरोबमध्ये कॉटनच्या साड्या आवश्यक आहेत. विशेषत: जर तुम्ही प्रोफेशनल असाल तर तुम्ही कॉटनच्या साड्या घालू शकता. हे तुमचा लूक रिच आणि क्लासी तसेच स्लिम बनवण्यात मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel