Dresses to Look Cool and Stylish in Summer: उन्हाळ्यात जर तुम्हाला हवामानानुसार कपडे घालून स्टायलिश दिसायचे असेल, तर या ५ प्रकारच्या ड्रेसेसना नक्कीच तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवा. जेणेकरून तुम्ही घरातून बाहेर पडताच लोक तुमच्या स्टाईलची प्रशंसा करतील. उन्हाळ्यात हेवी ड्रेसेस घालायला फारसे कोणाला आवडत नाही. या काळात हलके आणि कंफर्टेबल कपडे घालण्याकडे लोकांचा कल असतो. हे ड्रेसेस तुम्हाला गरम उन्हातही कूल आणि स्टायलिश लूक देतील. यांना आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायला विसरू नका.
कफ्तान ड्रेसची गणना अतिशय कंफर्टेबल ड्रेसमध्ये केली जाते. खूप गरम वाटत असेल तर कफ्तान ड्रेस जवळ ठेवा. तुम्ही सुट्टीवर गेला असाल किंवा मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी कफ्तान डिझाइन कुर्ती किंवा ड्रेस दोन्ही स्टायलिश दिसेल.
चिकनकारी कपडे उन्हाळ्यात खूप आकर्षक दिसतात. तसेच ते कूल आणि एलिगंट लुक देतात. आजकाल चिकनकारी कुर्त्या सोबतच ड्रेसेसही बाजारात उपलब्ध आहेत. हे खरेदी करून तुम्ही ट्रेंडी लुक मिळवू शकता.
तुम्हाला ऑफिसमध्ये काही एलिगंट कॅज्युअल लुक हवा असेल तर शॉर्ट कुर्ती हा एक चांगला पर्याय आहे. स्लीव्हलेस, प्रिंटेड शॉर्ट कुर्ती डेनिम किंवा क्रॉप ट्राउझर्ससोबत परफेक्ट दिसेल.
जर तुम्हाला ब्रीझी लूक हवा असेल तर सुंदर फ्लोरल प्रिंट ड्रेस जवळ ठेवा. कोणत्याही प्रसंगी हे घातले तर तुम्ही सुंदर दिसाल. या ड्रेसमध्ये तुमचा लूक पूर्णपणे समर सीझनवाला दिसेल.
साड्यांची क्रेझ असेल तर पातळ सुती साडीही जवळ ठेवा. स्लीव्हलेस ब्लाउज किंवा आकर्षक ब्लाउज डिझाइनसह कॉटन साडी पेअर करून ऑफिस मीटिंगला जा. हा लुक कंफर्टेबल आणि परफेक्ट दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या