मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी

Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 02, 2024 10:18 PM IST

Summer Drink Recipe: प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांनी केलेली ही समर कूलर रेसिपी केवळ उष्णतेपासूनच आराम देत नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे ड्रिंक टरबूज आणि खरबूज दोन्ही मिळून तयार केले जाते.

Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी
Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी (freepik)

Watermelon Cooler Recipe: उन्हाळ्याच्या हंगामात लोक सहसा अशी फळे आणि ड्रिंकना त्यांच्या रुटीनचा एक भाग बनवतात, ज्यामुळे कडक उन्हात आराम आणि थंडपणा मिळण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे असेच एक पेय म्हणजे मेलन कूलर. प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांनी बनवलेली ही समर ड्रिंक रेसिपी केवळ उष्णतेपासूनच आराम देत नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे ड्रिंक टरबूज आणि खरबूज दोन्ही एकत्र करून तयार केले जाते. या ड्रिंकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चव लहान मुलांबरोबरच मोठ्यांना देखील आवडते. एवढेच नाही तर हे ड्रिंक बनवणे देखील खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घ्या उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी टेस्टी मेलन कूलर कसे बनवावे.

ट्रेंडिंग न्यूज

मेलन कूलर बनवण्यासाठी साहित्य

- १ कप कापलेले खरबूजचे तुकडे

- १ कप कापलेले टरबूजचे तुकडे

- १ लिंबाचा रस

- १ चमचा चिरलेले आले

- सजावटीसाठी पुदिन्याची पाने

मेलन कूलर बनवण्याची पद्धत

मेलन कूलर रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्लेंडरमध्ये खरबूजचे तुकडे, टरबूजचे तुकडे, लिंबाचा रस, चिरलेले आले टाका. आता सर्व मिक्सरमध्ये ब्लेंड करा. यानंतर एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका. आता आधी तयार केलेला मेलन ज्यूस ग्लासमध्ये टाका. खरबूज, टरबूज आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग