Watermelon Panna Recipe: उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फक्त पाणी पुरेसे नाही. पण याचा अर्थ असा नाही की सोडा असलेले ड्रिंक प्यावे. बाजारात मिळणारे रेडी ड्रिंकऐवजी तुम्ही घरच्या घरी टेस्टी ड्रिंक्स बनवू शकता. घर बनवलेले चटपटीत टरबूजचे ड्रिंक तहान शमवण्यासाठी योग्य आहे. याशिवाय ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्ही घरी नवीन रीफ्रेशिंग ड्रिंक शोधत असाल तर आज संध्याकाळी टरबूज पन्हं ड्रिंक बनवा. याची रेसिपी खूप सोपी आहे. विशेष म्हणजे हे लवकर तयार होते. याची रिफ्रेशिंग चव अप्रतिम असून तुम्ही हे नेहमी बनवून प्याल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे ड्रिंक आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवावे टरबूज पन्हं.
- एक टरबूज
- साखर ३/४ कप
- काश्मिरी लाल मिरची
- जिरे एक चमचा
- काळी मिरी १०-१२
- मूठभर पुदिन्याची पाने
- मीठ
- काळे मीठ एक चमचा
- लिंबाचा रस
- बर्फ
- लिंबाचे तुकडे
- पाणी
हे ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम टरबूज सोलून घ्या. नंतर याचे छोटे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता एखाद्या कढई किंवा भांड्यात एक मोठी चाळणी ठेवा आणि टरबूजचा रस गाळून घ्या. आता यात साखर घाला. हे अर्धे होईपर्यंत शिजवा. जेव्हा हे अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा. आता ताजे जिरे आणि काळी मिरी एका पॅनमध्ये कोरडी भाजून घ्या. नंतर लाटण्याच्या मदतीने हे बारीक वाटून घ्या. तसेच सोबत हिरवी पुदिन्याची पाने त्यांच्या देठासोबत टाका. आता लिंबाचा रस घाला. शेवटी पुदिन्याची पाने बाहेर काढून घ्या. हे एखाद्या काचेच्या बॉटल मध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
तुम्ही हे दहा ते पंधरा दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा वाटेल तेव्हा ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि तयार टरबूज पन्हं घाला. वर थोडे थंड पाणी घाला. चांगले मिक्स करा आणि थंडगार सर्व्ह करा.