मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Tips: उन्हाळ्यात फ्रिजमधल्या कोल्डड्रिंक्सकडे सतत हात जातोय? हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ चुका टाळा

Summer Tips: उन्हाळ्यात फ्रिजमधल्या कोल्डड्रिंक्सकडे सतत हात जातोय? हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ चुका टाळा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 06, 2024 01:17 PM IST

Summer Health Tips: उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सचं अतीसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कोल्डड्रिंक्सच्या अतिसेवनाने यकृत, हृदयासारख्या अवयवांभोवती अतिरिक्त चरबी जमा होते.

उन्हाळ्यात सतत कोल्डड्रिंक्सकडे वळता? हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ चुका टाळा
उन्हाळ्यात सतत कोल्डड्रिंक्सकडे वळता? हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ चुका टाळा

Summer Health Tips: संपूर्ण देशभरात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. उन्हाळा आला की, अनेकजण अगदी सहजपणे कोल्डड्रिंक्स, आइसक्रीम, विविध फ्लेवर असलेली सरबतं याकडे वळतात. पण, याचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने येत्या महिन्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. हे अति उष्ण तापमान आपल्या शरीरावर, हृदयावर अनेक कारणांमुळे परिणाम करू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात असे हवेहवेस वाटणारे पदार्थ, शीतपेय याचा मोह टाळणं गरजेचं आहे. त्याशिवाय रखरखत्या उन्हाळ्यात आपल्या आारोग्याकडे विषेश लक्ष देणंही महत्त्वाचं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सचं अतीसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कोल्डड्रिंक्सच्या अतिसेवनाने यकृत, हृदयासारख्या अवयवांभोवती अतिरिक्त चरबी जमा होते. त्यामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होऊन, मधुमेहाचा धोका वाढू शकतो. शिवाय हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक याचाही धोका निर्माण होऊ शकतो.

Coffee Face Mask: चेहऱ्यावरील सूज आणि डार्क सर्कल दूर करेल कॉफी फेस पॅक, जाणून घ्या कसे लावायचे

काय म्हणतात डॉक्टर?

कोल्डड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. यात अधिक कॅलरी असून, शरीराला यातून कोणत्याही प्रकारच्या पौष्टिक गोष्टी मिळत नाहीत. गुरुग्राम येथील क्लिनिकल आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, डॉ मनीष बन्सल यांनी कोल्डड्रिंक्सच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम सांगितले आहेत. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की कोल्डड्रिंक्स शरीरात गेल्यानंतर चयापचन होऊन त्याचं रुपांतर चरबीमध्ये होतं. ही चरबी केवळ त्वचेखाली नाही, तर यकृत आणि हृदयाजवळ देखील जमा होते. ही चरबी Visceral Fat म्हणून ओळखली जाते, जी शरीरास धोकादायक ठरते. या शीतपेयांचं अतीसेवन किंवा नियमित सेवन केल्यास ते वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतं.

Heatwave: उष्णतेच्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स, आहेत खूप उपयुक्त

अतिरिक्त व्हिसरल फॅट अर्थात या चरबीमुळे शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो. यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो. कोलेस्ट्रॉलवर देखील विपरित परिणाम होतो आणि याचा यकृतावरही परिणाम होऊ शकतो. शरीरासाठी वाईट असलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली, तर चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसंच ट्रायग्लिसराइड्स हा रक्तातील चरबीचा दुसरा प्रकार देखील वाढतो. या फॅट्समुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयाच्या रक्त प्रवाहात अडथळा आणतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात, असंही डॉ. मनीष बन्सल यांनी सांगितलं. तसंच अॅसिडिटी, जळजळ अशा समस्याही निर्माण होऊ शकतात.

Fitness Mantra: रिकाम्या पोटी चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला होईल मोठे नुकसान

उन्हाळ्यात हृदयाची कशी काळजी घ्याल?

> उन्हाळ्यात शरीराचं हायड्रेशन महत्त्वाचं आहे. शरीरात डिहायड्रेशन झालं, तर हृदयावर ताण येऊ शकतो. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोल्डड्रिंक्सऐवजी पाणी प्या.

> उन्हाळ्यात अल्कोहोलचं सेवन टाळा. अति अल्कोहोल सेवनाने वजन वाढतं, रक्तदाब वाढतो. त्याशिवाय हृदयाचे स्नायू कमकुवत होतात.

> उन्हाळ्यातही व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. पोहणं, सकाळी किंवा संध्याकाळी चालणं असं व्यायाम फायदेशीर ठरू शकतात.

WhatsApp channel