Sugarcane Benefits : देवी लक्ष्मीच्या पूजेत आवर्जून वापरला जातो ऊस! तुम्हाला माहितीयत का ऊसाचे ‘हे’ फायदे?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sugarcane Benefits : देवी लक्ष्मीच्या पूजेत आवर्जून वापरला जातो ऊस! तुम्हाला माहितीयत का ऊसाचे ‘हे’ फायदे?

Sugarcane Benefits : देवी लक्ष्मीच्या पूजेत आवर्जून वापरला जातो ऊस! तुम्हाला माहितीयत का ऊसाचे ‘हे’ फायदे?

Oct 29, 2024 08:33 PM IST

Benefits Of Eating Sugarcane: माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ऊस वापरला जातो, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. ऊस हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. चला जाणून घेऊया ऊसाचे गुणकारी फायदे…

Benefits Of Eating Sugarcane
Benefits Of Eating Sugarcane

Health Benefits Of Eating Sugarcane: धनत्रयोदशी अर्थात धनतेरसपासून दीपोत्सवाचा सण सुरू होतो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने साधकाच्या घरात देवी लक्ष्मीची कृपा आणि समृद्धी कायम राहते. मात्र, देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये ऊस अर्पण केला जातो, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. कारण ऊस हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. चला जाणून घेऊया देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये ऊस का अर्पण केला जातो आणि त्याचे सेवन केल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात.

देवीच्या पूजेत का वापरतात ऊस?

पौराणिक कथांनुसार, एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी दर्शनासाठी आले होते. परंतु, काही कारणास्तव भगवान विष्णूंना दक्षिण दिशेला जावे लागले. अशा वेळी त्यांनी माता लक्ष्मीला तेथेच थांबून राहण्यास सांगितले. भगवान विष्णू तेथून निघून गेल्यानंतर देवी लक्ष्मी आपली भूक शमवण्यासाठी जवळच्या शेतकऱ्याच्या शेतात ऊस खाण्यासाठी गेल्या.

जेव्हा भगवान विष्णू परत आले, तेव्हा त्यांनी माता लक्ष्मीला विचारले की, ज्या शेतकऱ्याची शेती आहे त्याच्याकडून आधी ऊस खाण्याची परवानगी घेतली आहे का? यावर माता लक्ष्मीने नकार दिला. माता लक्ष्मीच्या उत्तरानंतर भगवान विष्णूंनी त्यांना आपली चूक सुधारण्याची आज्ञा दिली आणि शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी माता लक्ष्मीला त्या शेतकऱ्याच्या घरी १२ वर्षे राहण्याची आज्ञा दिली. जेणेकरून शेतकऱ्याला माता लक्ष्मीच्या उपस्थितीतून समृद्धी मिळू शकेल.

१२ वर्षांनंतर माता लक्ष्मी शेतकऱ्याचे घर सोडून जाऊ लागली तेव्हा शेतकऱ्याने तिला आणखी काही दिवस राहण्यास सांगितले, त्यावर माता लक्ष्मी म्हणाली की, जोपर्यंत शेतकरी आणि त्याच्या पिढ्या ऊसाची पूजा करत राहतील, तोपर्यंत देवी नेहमी ऊसाच्या रूपाने त्यांच्या घरात राहतील आणि त्यांच्या घरात समृद्धी येईल. देवी लक्ष्मीच्या या वचनामुळे लक्ष्मीपूजेच्या वेळी ऊसाची ही पूजा केली जाते.

Ghee Benefits: आंघोळीपूर्वी नाभीमध्ये घाला तूप, आरोग्याला मिळतील ५ चमत्कारिक फायदे

ऊसाचा रस पिण्याचे फायदे

ऊर्जा मिळते : ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते. एवढेच नव्हे तर, ऊस कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेत शरीरासाठी ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइटचे काम करतो.

पचनाच्या समस्या दूर होतात : ऊसाचा रस पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी औषधाचे काम करतो. यामध्ये असलेले पोटॅशियमचे प्रमाण पोटातील पीएच लेव्हल संतुलित ठेवण्याचे काम करते.

स्त्रीयांसाठी फायदेशीर : एका संशोधनानुसार, ऊसाचा रस महिलांमध्ये ओव्हुलेशनशी संबंधित समस्या कमी करतो, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. याशिवाय ऊसाच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढून अॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत होते.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner