Apple Oats Cookies Recipe: दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना मिठाई देतात आणि आपला आनंद कुटुंब आणि मित्रांसह शेअर करतात. या दिवसांमध्ये पारंपारिक पदार्थांची रेलचेल असते. पण घरी पाहुणे आणि मित्रांना दिलेली प्रत्येक डिश आणि गोड पदार्थ टेस्टी असण्यासोबतच समोरच्या व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करुन बनवलेला असेलच असे नाही. विशेषत: जेव्हा आपण मधुमेहाच्या रुग्णांबद्दल बोलत असतो. अशा प्रकारचे पदार्थ या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतात. जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल आणि दिवाळीला तुमच्यासाठी काही हेल्दी ऑप्शन निवडायचे असतील, जे चवदार आणि आरोग्यदायी असतील, तर या दिवाळीत आहारतज्ञ दीपाली शर्मा यांनी सुचवलेल्या दिवाळीतील मिठाई आणि फराळ ट्राय करा. पाहा ही अॅपल ओट्सच्या कुकिजची रेसिपी.
- १/४ कप ओल्ड फॅशन्ड ओट्स
- १०-१५ तुकडे चिरलेले अक्रोड
- १/४ कप संपूर्ण गव्हाचे पेस्ट्री पीठ
- १/४ टीस्पून बेकिंग सोडा
- १/८ टीस्पून बेकिंग पावडर
- १/४ टीस्पून मीठ
- १/२ टीस्पून दालचिनी
- १/८ टीस्पून जायफळ
- १ टीस्पून अंड्याचा वाळलेला पांढरा भाग
- १/८ कप जाडसर बारीक केलेले साल काढलेली सफरचंद
- १/८ कप लाइट ब्राउन शुगर
- १/८ कप अॅपल बटर
- १/२ टीस्पून दाणेदार साखर
- १/२ टीस्पून कॅनोला ऑइल
- १/८ टीस्पून व्हॅनिला इसेंस
- १/८ कप वाळलेल्या सफरचंदाचे तुकडे
अॅपल-ओटमील कुकीज बनविण्यासाठी प्रथम ओव्हन ३७५ अंशांवर प्री-हीट करा. यानंतर ओट्स आणि नट्स एका बेकिंग शीटवर पसरवा आणि सोनेरी आणि सुवासिक होईपर्यंत बेक करा. असे सुमारे ५ ते ८ मिनिटे करा. यानंतर २ बेकिंग शीट कुकिंग स्प्रेने कोट करा. आता एका भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, दालचिनी आणि जायफळ घालून चांगले मिक्स करा. आता एका मोठ्या भांड्यात अंड्याचा पांढरा भाग, चिरलेले सफरचंद, ब्राऊन शुगर, अॅपल बटर, दाणेदार साखर, तेल आणि व्हॅनिला इसेंस चांगले मिक्स करा. आता त्यात कोरडे साहित्य घाला आणि थोडासा ओलावा येईपर्यंत ढवळत राहा. आता या मिश्रणात कोरडे सफरचंद घाला आणि बाजूला ठेवलेले ओट्स आणि ड्राय फ्रूट्स घाला. अशा प्रकारे तयार केलेले पीठ एका चमच्यात भरून बेकिंग शीटवर सुमारे २ इंच अंतरावर ठेवा. एका लहान भांड्यात उरलेली दाणेदार साखर आणि १/४ दालचिनीची काडी एकत्र करा. आता एका ग्लासच्या तळाला कुकिंग स्प्रेने कोट करा. हा ग्लास दालचिनी साखरेत बुडवा आणि त्याबरोबर कुकीजवर दाबा. प्रत्येक वेळी कुकीज दाबण्यापूर्वी हा ग्लास दालचिनी साखरेत बुडवा.
कुकीज एका वेळी एक शीट ब्राउन होईपर्यंत सुमारे १० ते १२ मिनिटे बेक करा. बेकिंग शीटवर सुमारे २ मिनिटे थंड केल्यानंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी त्यांना वायर रॅकमध्ये ट्रान्सफर करा. तुमच्या टेस्टी कुकीज तयार आहेत.