Home Remedies to Get Rid of Dandruff Naturally: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे जसे गरजेचे आहे तसेच त्वचा आणि केसांची काळजी घेणेही गरजेचे आहे. केसात कोंडा होतो. पण कोंड्याची समस्या जास्त त्रासदायक होते. खरे तर यामागे अनेक कारणे आहेत. हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्याने किंवा जास्त वेळ केस न धुणे यामुळे कोंडा होतो. अनेकदा असं होते की हा कोंडा तेवढ्या पुरता येतो आणि पुन्हा जातो. मग अशावेळी काय करावे सुचत नाही. अशा परिस्थितीत, या नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
सफरचंदाचे व्हिनेगरमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. याच गुणधर्मांमुळे टाळूची साफ होण्यास मदत होते. हा एक प्रभावी उपाय आहे आणि डोक्यातील कोंडा यामुळे पूर्णपणे काढून टाकण्यास मदत होते. यासाठी पाण्यात थोडेसे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. थोडावेळ राहू द्या आणि शॅम्पू करा.
खवलेयुक्त कोंडाही होतो. यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. बेकिंग सोडा एक्सफोलिएंट म्हणून कार्य करते. बेकिंग सोड्यामुळे टाळू स्वच्छ होण्यास मदत करते. बेकिंग सोडा टाळूच्या मृत पेशींनाही स्वच्छ करते आणि टाळूच्या संसर्गाचा प्रसार रोखते. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा, टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. नंतर आपले केस धुवा.
कोरफड हे तर स्किन केअरमध्ये टॉपला आहे. हे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापरले आहे. हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे कोंडा कमी करण्यासाठीही उपयुक्त असते. हे टाळू स्वच्छ करते तसेच आतून पोषण करते. हे टाळूमध्ये जळजळ कमी करते आणि त्यामुळे कोंडा झाल्यास कोरफडीचा वापर नक्कीच करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या