Death Rate : चिंता वाढवणारी बातमी! देशात अचानक मृत्यूंचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले, हे आजार आहेत कारण!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Death Rate : चिंता वाढवणारी बातमी! देशात अचानक मृत्यूंचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले, हे आजार आहेत कारण!

Death Rate : चिंता वाढवणारी बातमी! देशात अचानक मृत्यूंचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले, हे आजार आहेत कारण!

Updated Dec 08, 2023 01:40 PM IST

Health Care: एकट्या २०२२ मध्ये ५७ हजार लोकांचा अचानक मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यापैकी ५७ टक्के प्रकरणे एका प्रकारच्या आजरामुळे झाली होती. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १२ टक्के वाढ झाली आहे.

Sudden death rate increased by 12 percent
Sudden death rate increased by 12 percent (Freepik)

Sudden Death Rate Increased: गेल्या काही वर्षांत देशात अचानक मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. याच्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॉक्टर आणि आयसीएमआर सारख्या संस्था कारण शोधायचा प्रयत्न करत आहेत. 

नुकत्याच आलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार फक्त २०२२ या वर्षात सुमारे ५७ हजार लोकांचा अचानक मृत्यू झाला आहे. यापैकी ५७ टक्के घटनांमध्ये व्यक्तींच्या मृताचे कारण हे हृदयविकाराचा झटका होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नुसार, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रत्येक राज्यातील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एक वार्षिक अहवाल तयार करते. पोलीस आकस्मिक मृत्यूंना अनपेक्षित मृत्यू मानतात, ज्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू हिंसेव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे झालेला असतो. अचानक मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे हृदयविकार आणि ब्रेन हॅमरेज हे आहे. अशा मृत्यूला करोनाची लस कारणीभूत आहे अशी चर्चा केली जाते. कोरोनाची लस घेणारे लोक आकस्मिक मृत्यूचे बळी ठरत आहेत असं म्हटलं जात आहे. परंतु नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने या केसेसचा अभ्यास केला आणि ही बाब चुकीची असल्याचे निष्पन्न झाले. या अभ्यासात असे सांगण्यात आले होते की, अचानक मृत्यू आणि कोरोना लस यांचा काही संबंध नाही. आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच सल्ला दिला होता की ज्यांना कोरोना आहे त्यांनी काही वर्षे जास्त मेहनत आणि उच्च तीव्रतेचा व्यायाम करू नये.

काय आहे आकडेवारी?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणते की २०२२ मध्ये एकूण ३.९ लाख मृत्यूंपैकी १३.४ टक्के मृत्यू अचानक झाले. एवढेच नाही तर या मृत्यूंना बळी पडणाऱ्यांची संख्या पुरुषांमध्ये जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यापैकी, एक तृतीयांश लोक ४५ ते ६० वयोगटातील होते.

कोणत्या राज्यात मृत्यूचे प्रमाण जास्त?

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १४,९२७ आकस्मिक मृत्यूच्या केसेस समोर आल्या. याशिवाय केरळमध्ये ६,६०७ आणि कर्नाटकात ५,८४८ होते. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की नैसर्गिक आजारामुळे किंवा घरी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांची पोलिसांत नोंद होत नाही. त्यामुळे हा आकडाही कमी असू शकतो. गेल्या वर्षीही या राज्यांची क्रमवारी अशीच होती. आकडेवारीनुसार २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ३२,४१० मृत्यू झाले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्के जास्त आहे.

Whats_app_banner