मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  नखं तुटण्याची आणि खराब होण्याची ही आहेत कारणं, त्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

नखं तुटण्याची आणि खराब होण्याची ही आहेत कारणं, त्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 14, 2022 10:33 AM IST

अनेक लोक नखांच्या विविध आजारांमुळं त्रस्त असतात. नखं काळी पडणं किंवा नखांचा कलर बदलून ती तुटायला लागणं ही नखांच्या आजाराची सामान्य लक्षणं आहेत.

Hands Symptoms
Hands Symptoms (HT)

Hands Symptoms : शरीर आणि आरोग्य हे व्यक्तीच्या आहारावर अवलंबून असतं. कारण शरीरात कॉलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढला तर त्यामुळं विविध आजार होण्याची शक्यता असते. याचमुळं व्यक्तीच्या नखांचा रंग बदलायला लागतो किंवा नखं तुटू लागतात. त्यामुळं तुम्हाला या आजाराचा त्रास होत असेल तर यासाठी वेळीच सावधान होणं गरजेचं आहे. कारण चांगलं दिसण्यासाठी आणि नखांच्या सौंदर्यासाठी नखांचं आरोग्य राखलं जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळं या समस्या का निर्माण होतात आणि त्यासाठी काय करायला हवं, याबाबत जाणून घेऊयात.

नखांचा रंग का बदलतो?

जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल तर व्यक्तीनं वेळीच सावधान होणं गरजेचं असतं. शरीरात वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलच्या लेवलमुळं ही समस्या निर्माण होत असते. याशिवाय ज्या लोकांच्या शरीरात सातत्यानं रक्तप्रवाहात अडथळा येत असेल तर त्या लोकांना नखांची समस्या निर्माण होत असते. परिणामी नखांचा कलर बदलून ती तुटायला लागतात.

हातांना झणझण्या येणं...

अनेक लोकांना हातांना झणझण्या किंवा वात येण्याची समस्या असते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर यासाठी वेळीच अलर्ट होण्याची गरज असते. कारण ही समस्या हाय कॉलेस्ट्रॉलची लक्षणं असतात. याशिवाय ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास असतो अशा लोकांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते.

कॉलेस्ट्रॉलला लेवलला कंट्रोल करण्यासाठी काय कराल?

कॉलेस्ट्रॉलची लेवल नियंत्रित करण्यासाठी व्यक्तीला सर्वात आधी त्याची असंतुलित असलेली लाईफस्टाईल बदलावी लागेल. याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्यांचं भरपूर प्रमाणात सेवन करावं लागेल. त्याचबरोबर शरीरात कॉलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचं सेवन करायला हवं.

या समस्येचा सामना करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर दररोज नियमित व्यायाम करायला हवा. त्यामुळं व्यक्तीचं आरोग्य आणि फिटनेस राखण्यास मदत होते. याशिवाय हे करत असताना व्यक्तीनं आपला आहार हा चांगला आणि संतुलित ठेवायला हवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या