Success Mantra: आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज स्वतःला बोला 'या' गोष्टी, गाठाल यशाचे शिखर-success mantra say these things to yourself daily to boost your self confidence ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Success Mantra: आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज स्वतःला बोला 'या' गोष्टी, गाठाल यशाचे शिखर

Success Mantra: आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज स्वतःला बोला 'या' गोष्टी, गाठाल यशाचे शिखर

Sep 12, 2024 10:17 PM IST

Success Tips in Marathi: तुम्हालाही तुमचे ध्येय पूर्ण करून यश मिळवायचे असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज सकाळी स्वत:ला या ५ गोष्टी सांगायला विसरू नका.

success mantra आत्मविश्वास वाढवण्यासाठी टिप्स
success mantra आत्मविश्वास वाढवण्यासाठी टिप्स (shutterstock)

Tips to Boost Self Confidence: आयुष्यात यश मिळवण्यासाठी व्यक्तीने स्वत:वर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा आत्मविश्वासाच्या अभावामुळे लोक मेहनत करूनही यश मिळवू शकत नाहीत. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या क्षमतांबद्दल सकारात्मक विचार करणे. आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे लोकांच्या नातेसंबंधांवर, कामावर किंवा अभ्यासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे समजून घेतले पाहिजे. एखाद्या व्यक्तीमध्ये चांगला आत्मविश्वास असल्यास त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यशस्वी होण्यास मदत होते. तुम्हालाही आपले ध्येय पूर्ण करून यश मिळवायचे असेल तर आत्मविश्वास वाढविण्यासाठी रोज सकाळी स्वत:ला या ५ गोष्टी नक्की बोला.

मी हे आधी केले आहे आणि मी हे करू शकतो

आयुष्यात कुठल्याही क्षणी तुम्हाला कोणतेही काम करणे अवघड वाटत असेल तर सर्वप्रथम आरशासमोर उभे राहून स्वत:ला हे वाक्य बोला - 'मी अशा प्रकारचे काम याआधीही केले आहे आणि हे काम मी सहज करू शकतो'. हे स्वत:ला सांगितल्याने तुम्हाला स्वत:मध्ये एक नवी उत्साह जाणवेल आणि ते अवघड काम तुम्ही सहज करू शकाल.

यापेक्षा ही कठीण परिस्थिती मी पाहिली आहे, मी सर्व काही सहज करू शकतो

काही काम करताना तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमकुवत होत आहे असे वाटत असेल तर स्वत:ला सांगा - यापेक्षा कठीण परिस्थिती मी पाहिली आहे, मी पुढेही सर्व काही करू शकतो. माझा माझ्या मेहनतीवर आणि विवेकबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे.

विचारापेक्षा मोठं काहीच नसतं, विचार केला तर उत्कटता सोपी होते

'इच्छा तिथे मार्ग' ही म्हण तुम्ही लहानपणापासून ऐकली असेलच. ही म्हण सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर हे बोला की तुम्ही हे काम केल्यानंतरच विश्रांती घ्याल. जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार नाही.

जर इतर लोक करू शकतात, तर मी का नाही, मी देखील हे करू शकतो

स्वत: मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. एखादे काम जर तुमचा मित्र किंवा परिचित करू शकत असेल तर ते काम तुम्ही स्वत: का करू शकत नाही, हे रोज स्वतःला विचारा. विश्वास ठेवा, हा प्रश्न स्वत:ला विचारल्याने तुम्हाला स्वत:मध्ये एक नवा उत्साह आणि आत्मविश्वास जाणवू लागेल.

आयुष्य असेल तर अडचणी येतच राहतील, पराभव हा प्रयत्न न करणाऱ्यांचाच होतो

कष्ट केल्याशिवाय यश मिळू शकत नाही. अशावेळी आयुष्यात कधी तरी अडचणी पाहून निराश वाटू लागल्यास हे वाक्य स्वत:ला नक्की सांगा - आयुष्य असेल तर अडचणी येतच राहतील, पराभव त्याचा होतो जो प्रयत्न करत नाही. त्यामुळे संघर्षाला न घाबरता आपली भूमिका बजावून ध्येयाकडे वाटचाल करत राहा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner