Personality Changes to Increase Success Chances in Interview: आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वेळोवेळी अनेक प्रकारचे इंटरव्ह्यु द्यावे लागतात. खरं तर हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील यू-टर्न असतो, ज्यावर व्यक्तिमत्त्वात काही बदल करून सहज मात करता येते. अनेक वेळा तयारी नीट झालेली असतानाही हवे तसे यश मिळत नाही. काही वेळा मुलाखती दरम्यान काही लोक खूप नर्व्हस होतात, जे त्यांच्या कमकुवत आत्मविश्वास आणि अपयशाचे कारण बनतात. अशा वेळी तुम्हालाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी इंटरव्ह्युव क्रॅक करायचे असेल तर आधी व्यक्तिमत्त्वात काही महत्त्वाचे बदल करा.
तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज योग्य असणं खूप गरजेचं आहे. मुलाखतीला जाण्यापूर्वी तुमची उभी राहण्याची आणि बसण्याचे पोश्चर चांगले आहे की नाही याची खात्री करून घ्या. बोलताना समोरच्याशी आय कॉन्टॅक्ट नक्की ठेवा.
तुम्ही तुमच्या ड्रीम लाइफमध्ये कोणालाही आपला आदर्श समजू शकता. पण खऱ्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीची कॉपी करण्याची चूक कधीही करू नका. स्वत:ची ओळख निर्माण करा. असे केल्याने लोक तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करून तुमच्यासोबत काम करायला पसंत करतील.
मुलाखतीची तयारी करताना टाइम मॅनेजमेंटकडे विशेष लक्ष द्या. वेळेचे मोल करून दररोज स्वत:साठी नवीन योजना तयार करा. आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार दिवसाचे नियोजन करा.
मुलाखतीची तयारी करताना सर्वप्रथम आपल्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वासाचा गुण रुजवावा. स्वत:वर विश्वास नसेल तर मुलाखत घेणारी व्यक्तीही तुमच्यावर प्रभावित होणार नाही.
मुलाखतीत यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम व्यक्तीने आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सुरुवात कंपनी आणि पद याची नीट चौकशी, तपास करून करा. कम्फर्ट झोनमध्ये राहून एखादी व्यक्ती नवनवीन गोष्टी करून पाहण्यापासून आणि स्वत:ची बलस्थाने ओळखण्यापासून दूर राहते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)