Stretch Marks: पोट, कंबरेच्या स्ट्रेच मार्क्सने त्रस्त आहात? 'या' घरगुती उपयाने कायमचे गायब होतील व्रण-stretch marks home remedies these oils will help remove stretch marks ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Stretch Marks: पोट, कंबरेच्या स्ट्रेच मार्क्सने त्रस्त आहात? 'या' घरगुती उपयाने कायमचे गायब होतील व्रण

Stretch Marks: पोट, कंबरेच्या स्ट्रेच मार्क्सने त्रस्त आहात? 'या' घरगुती उपयाने कायमचे गायब होतील व्रण

Aug 08, 2024 10:05 AM IST

Stretch Marks Home Remedies: शरीरावर पडलेले स्ट्रेच मार्क्स तुमच्या सौंदर्यात बाधा आणायचे काम करते असे तुमचे मत असते. वास्तविक, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात.

Stretch Marks Home Remedies
Stretch Marks Home Remedies

Stretch Marks Home Remedies: प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीराची काळजी घेत असतो. आपले सौंदर्य दिवसेंदिवस टिकून राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे विविध गोष्टींच्या आधारे लोक आपल्या शरीराची काळजी घेत असतात. परंतु बऱ्याचदा, शरीरावर पडलेले स्ट्रेच मार्क्स तुमच्या सौंदर्यात बाधा आणायचे काम करते असे तुमचे मत असते. वास्तविक, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. अचानक वजन वाढणे, वजन कमी होणे किंवा इतर कोणत्याही कारणाने त्वचा ताणणे यामुळे शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर बहुतेक महिलांच्या पोटावर आणि कंबरेवर स्ट्रेच मार्क्स दिसतात.

महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलांचे वयानुसार शरीर विकसित होते. ज्यामुळे त्यांच्या हात, पाय, मांड्या, पोट किंवा छातीवर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. काही घरगुती उपायांनी हे व्रण कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हे व्रण असे असतात जे एका रात्रीत बरे होऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्याला काही वेळ देणे आवश्यक असते. त्यासोबत तुम्ही घरातील काही गोष्टी वापरून त्याच्या मदतीने हे स्ट्रेच मार्क्स मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. त्यामुळेच तुम्हाला स्ट्रेच मार्क्ससाठी महागडे केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्याची गरज नाही. तुम्ही या सहज उपलब्ध होणाऱ्या घरगुती गोष्टींच्या आधारे स्ट्रेच मार्क्स गायब करू शकता.

'हे' घरगुती तेल स्ट्रेच मार्क्सवर उपयुक्त-

नारळाचे तेल (खोबरेल)-

नारळाचे तेल स्वयंपाकापासून ते सौंदर्य वाढवण्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये उपयुक्त ठरते. नारळाचे तेल ज्याला आपण खोबरेल म्हणतो, ते स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी वापरता येते. खोबरेल तेलात फॅटी ॲसिड आढळते. हे तेल त्वचेला अँटी-इन्फ्लीमेन्टरी गुणधर्म देखील प्रदान करते. आणि तुमच्या त्वचेत कोलाजन तयार करण्यास देखील उपयुक्त आहे. स्ट्रेच मार्क्सवर खोबरेल तेल हलक्या हाताने लावा. जर त्वचा खूप तेलकट वाटत असेल तर काही वेळाने हे तेल लावून पुसून टाका. असे नियमित केल्याने काही दिवसांतच फरक दिसायला लागेल.

बदाम तेल-

बदाम हे सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेच, परंतु त्याचे तेलसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. स्ट्रेच मार्क्सवर बदामाचे काहीसे कडवट तेल लावल्याने त्वचेची लवचिकता वाढते ज्यामुळे त्वचा ताणली गेली तरी स्ट्रेच मार्क्स दिसणार नाहीत. परंतु प्रेग्नेन्सीदरम्यान हे तेल वापरू नका. जर तुमचे स्ट्रेच मार्क्स खूप जुने असतील तर तुम्ही हे तेल वापरावे. शिवाय लालसर दिसणाऱ्या स्ट्रेच मार्क्सवर हे तेल लावणे टाळा.

ऑलिव ऑईल-

ऑलिव्ह ऑईल हे व्हिटॅमिन ईने समृद्ध आहे. ऑलिव्ह ऑईल स्ट्रेच मार्क्सवरदेखील अत्यंत फायदेशीर असते. तुम्ही स्ट्रेच मार्क्सवर ऑलिव्ह ऑईल लावू शकता. या तेलाचा उत्तम परिणाम मिळविण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी ते स्ट्रेच मार्क्सवर लावा. हे तेल दिवसभरातही जवळपास अर्धा तास लावता येते. त्वचेतून ऑलिव्ह ऑइल साफ करण्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग