Stress relief remedies: धावपळीच्या आयुष्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमुळे केवळ मानसिक समस्या येत नाहीत, तर अनेक प्रकारच्या शारीरिक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे तणाव कमी करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला तणाव कमी करायचा असेल तर तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. अशी काही योगासने आहेत जी तणाव पातळी कमी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा योगाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळेल. चला जाणून घेऊया कोणती आहेत ही योगासने...
वज्रासनामुळे चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. या योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. तुमच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतो. तसेच, वज्रासन योग चांगल्या आणि गाढ झोपेसाठी चांगला समजला जातो. तुमची पुरेशी झोप पूर्ण झाल्यानेही अतिरिक्त तणाव दूर होतो.
पश्चिमोत्तनासन हा योग तुम्हाला तणावाची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो. इतकेच नाही तर शरीराचे दुखणे, खांदेदुखी आणि पोटदुखी कमी करण्यासाठी तुम्ही हा योगाभ्यास करू शकता. वाढता ताण कमी करण्यासाठी दररोज पश्चिमोत्तनासनाचा सराव करा. त्यामुळे तुमचा तणाव दूर होऊन तुम्हाला फ्रेश आणि ऍक्टिव्ह वाटेल.
तणाव कमी करण्यासाठी तुम्ही नियमित सुखासन करू शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी दररोज सुमारे १० मिनिटे सुखासन करा. हे तुमचे मन शांत करू शकते. ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करण्यात देखील ते प्रभावी आहे. सुखासनाचा नियमित सराव केल्यास शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. हे एकूण शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.
मार्जारासन योग तणाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. याला कॅट पोझ असेही म्हणतात. हे योग पाठीची हाडे आणि स्नायूंच्या ताकदीला मदत करते. तसेच पाठ आणि मान दुखणे कमी होऊ शकते. या योगाच्या नियमित सरावाने तुम्हाला तणावातून आराम मिळू शकतो.
बलासन योग ताणतणाव दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊ शकते. याशिवाय, ते शरीरात रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. जर तुम्ही वाढत्या तणावामुळे त्रस्त असाल, तर तुम्ही नियमितपणे बलासन योगाचा सराव केला पाहिजे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)