मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  स्ट्रीट फूड विक्रेत्याने बनवले इडली आईस्क्रीमचे फ्यूजन, Viral Video पाहून फूडीज नाराज

स्ट्रीट फूड विक्रेत्याने बनवले इडली आईस्क्रीमचे फ्यूजन, Viral Video पाहून फूडीज नाराज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 07, 2024 09:40 PM IST

Viral Video: स्ट्रीट फूड विक्रेत्याने इडली आईस्क्रीम बनवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ते पाहून लोक 'ते बेकायदेशीर आहे' आणि 'इडलीला न्याय हवा' अशा प्रतिक्रिया देत आहेत.

इडली आईस्क्रीम व्हायरल व्हिडिओ
इडली आईस्क्रीम व्हायरल व्हिडिओ

Idli Ice Cream Viral Video: रस्त्यावरील एका विक्रेत्याचा इडली आईस्क्रीम बनवतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आईस्क्रीमसोबत दक्षिण भारतीय पदार्थाचे मनोरंजक फ्युजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अनोखा आईस्क्रीम रोल बनविण्यासाठी त्यात सांभर आणि चटण्यादेखील वापरल्या आहेत.

फूड व्लॉगर सुकृत जैन यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती इडलीचे लहान तुकडे करताना दिसते. नंतर तो इडलीवर लाल चटणी, नारळाची चटणी, सांभर आणि काही आईस्क्रीम टाकतो. त्यानंतर तो हे मिश्रण थंड प्लेटवर पसरण्यापूर्वी चांगले मिक्स करतो. शेवटी तो इडली आईस्क्रीम प्लेट घेतो आणि अर्धी इडली आणि थोडी चटणी घालून गार्निश करतो.

१७ जानेवारीला शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ १२.७ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. अनेकांनी व्हिडिओला कमेंट करून इडली आईस्क्रीमच्या चवीबद्दल चर्चा केली. व्हिडिओ शेअर करणारे सुकृत जैन यांनी म्हटले, "स्वाद थोडा वेगळा होता पण चांगला होता."

"ईईई, ज्यांनी हे शोधलं आहे त्यांना अटक व्हायला हवी!", असं एका व्यक्तीनं पोस्ट केलं आहे. आणखी एक युजरने लिहिले की, "ब्रेकअप जास्त दुखते असे कोणी म्हटले! अरे मेरा इडली [ohh my Idli]." "OMG, मी हे काय पाहिलं?" अशा शब्दात तिसऱ्या व्यक्तीने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर चौथ्याने कमेंट केली, "त्या इडलीला न्याय हवा!" हे बेकायदेशीर असल्याचे पाचव्या युजरने लिहिले असून, सहाव्या व्यक्तीने इडलीला न्याय देण्याचे म्हटले आहे.

WhatsApp channel

विभाग