पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुम्हाला कोणता ई-मेल आलाय का?, युट्यूबच्या नियमांमध्ये मोठा बदल

युट्यूब

व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी युट्यूबचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युटयूबच्या सेवा नियमांमध्ये बदल करण्यात येत असून, नवे बदल १० डिसेंबरपासून लागू होत आहेत. या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एखादे युट्यूब अकाऊंट जर व्यावसायिकदृष्ट्या चालवणे कंपनीला शक्य नसेल, तर युट्यूबकडून ते बंद केले जाऊ शकते. युट्यूब एकतर्फीपणे एखादे अकाऊंट बद करू शकतो. सेवा नियमातील बदलांसंबंधीची माहिती देणारे ई-मेल्स युटूयबकडून वापरकर्त्यांना पाठविण्यात येत आहे. 

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत

युट्यूबच्या नव्या सेवा नियमांमध्ये सर्वात मोठा बदल असा आहे की, जर तुमचे युट्यूब किंवा गूगल अकाऊंट व्यावसायिकदृष्ट्या चालवणे परवडत नसल्याचे कंपनीला दिसल्यावर ते बंद करण्याचा निर्णय कंपनी आपल्या पूर्ण अधिकारात घेऊ शकते. पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि ऑनलाईन ग्राहकांशी कटिबद्ध राहण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी हे व्यासपीठ कशा पद्धतीने काम करते आणि त्याचे सेवा नियम काय आहेत, यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

काँग्रेसचे ठरल्यावरच आमचाही निर्णय - राष्ट्रवादी काँग्रेस

युट्यूबवर चॅनेल चालविणारे प्रकाशक या बदलांबद्दल फारसे समाधानी नाहीत. त्याचबरोबर या सेवा नियमांची वाक्यरचना गोंधळात आणखी भर टाकणारी असल्याचे काही वापरकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, युट्यूब कोणत्याही सामान्य चॅनेल किंवा अकाऊंटवर कारवाई करणार नाही. पण काहीजण आपल्याकडील दृश्ये केवळ ऑनलाईन व्यासपीठावर साठविण्यासाठी युट्यूबचा वापर करतात. ते हा मजकूर प्रसिद्ध करीत नाहीत. त्यांच्यावर कारवाईसाठीच युट्यूबने हा निर्णय घेतला आहे, असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.