पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या कंपनीच्या मोबाइलची होते सर्वाधिक ऑनलाइन विक्री

शाओमी

गेल्या वर्षभरात ऑनलाइन फोनच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. भारतात २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांत  ऑनलाइन मोबाइल खरेदीचा आलेख हा २६% नीं वाढला आहे. तर ऑफलाइन म्हणजेच दुकानात जाऊन फोन खरेदी करण्याचं प्रमाण हे ४% नीं घटलं आहे. 

२०१९ या वर्षांत शाओमी कंपनीनं सर्वाधिक ऑनलाइन मार्केटवर आपला जम बसवला आहे. ४६ % ऑनलाइन मोबाइल खरेदीचं जाळं हे शाओमी कंपनीनं व्यापलं असल्याचं काऊंटरपॉईंडट मार्केट मॉनिटरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 

शाओमी भारतात लाँच करणार स्वस्तातले स्मार्टबँड

शाओमीच्या ऑनलाइन खपात  Redmi Note 7 Pro, Redmi 6A आणि Redmi Note 6 Pro या तीन मोबाइलचा समावेश सर्वाधिक आहे. नव्यानं लाँच होणारे फोन्स त्यावर दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलतींमुळे ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. 

शाओमीबरोबरच रिअलमी, सॅमसंग यांसारख्या कंपनींच्या मोबाईलन्सनां ऑनलाइन सर्वाधिक पसंती असते. या हँडसेटच्या किमती १५ ते २० हजारांच्या घरात आहेत. बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीत चांगले हँडसेट मिळत असल्यानं भारतीय ग्राहकांची या फोन्सनां सर्वाधिक पसंती असते. 

४० हजारांहून अधिक किंमत असलेल्या 'अ‍ॅपल वॉच'मध्ये नेमकं आहे तरी काय?